Pune Crime | 30 कोटीच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी अली अकबर जाफरी व वनेसा डिसुजा यांच्यावर खंडणीचा गुन्हा

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | विकसन करार केला असताना जमीन दुसऱ्याच्या नावे करुन फसवणूक करुन 30 कोटी रुपयांची खंडणी (Ransom) मागणाऱ्या दोघांविरोधात पुण्यातील (Pune Crime ) लष्कर पोलीस ठाण्यात (lashkar police station) खंडणीचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अली अकबर जाफरी Ali Akbar Jafri (रा. बंगला नं.8, नेपीयर रोड, कँप पुणे) आणि वनेसा डोनाल्ड डिसुजा Vanessa Donald D’Souza (रा. 206 अकबर रेडीयंट प्लाझा, 327 महात्मा गांधी रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी हेमंत बागारेड्डी मोटाडु Hemant Bagareddy Motadu (वय-58 रा. बंगला नं. 10, ईस्टस्ट्रीट कँप, पुणे) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 16 जुलै रोजी पुणे कँपातील कोहीनुर हॉटेलमध्ये (Kohinoor Hotel Pune Camp) घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली जाफरी यांनी हवेली तालुक्यातील चऱ्होली येथील जमीन हिरानंदानी प्रॉपट्रिज प्रा. लि. (Hiranandani Properties Pvt. Ltd.) तर्फे निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) यांना करार करुन 2005 मध्ये लिहून दिली आहे.
जमीन लिहून दिली असतानाही अली जाफरी यांनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने ही जमीन वनेसा डिसुजा यांच्या नावे करुन खरेदीखत केले.
आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांची फसवणूक केली.

 

आरोपी अली जाफरी याने 16 जुलै रोजी पुणे कँपमधील हॉटेल कोहीनुर येथे फिर्यादी हेमंत मोटाडु यांना बोलावून घेतले. त्याठिकाणी त्याने 30 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
तसेच पैसे दिले नाही तर नुकसान करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन लष्कर पोलिसांनी अली जाफरी आणि वनेसा डिसुजा यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पुणे गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) खंडणी विरोधी पथक (Anti-ransom squad) एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप (Senior Police Inspector Jagtap) हे करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Ali Akbar Jaffrey and Vanessa D’Souza charged in Rs 30 crore fraud and ransome case in lashkar police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील अपघातातून थोडक्यात बचावले

Pune Crime | सीटी स्कॅन मशीन देण्याच्या आमिषाने डॉक्टरांना 18 लाखांना गंडा

Delta Variant | लसीकरणाने तयार होणार्‍या अँटीबाडी समोर निष्प्रभ होतो कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, शास्त्रज्ञांचा दावा