Pune Crime | आंबवणे येथील जिल्हा बँकेत चोरीचा प्रयत्न, आरोपींना पाच तासांत अटक

वेल्हे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) वेल्हे तालुक्यातील आंबवणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC Bank) फोडून चोरीचा प्रयत्न (attempted burglary) केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी वेल्हे पोलिसांनी (Velhe police) अवघ्या पाच तासांत अटक (arrest) केली आहे. चोरट्यांनी बँकेच्या तिजोरीच्या स्ट्राँग रूम मधील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

 

आकाश रोहिदास तळेकर (वय-22 रा. अंबवणे, ता. वेल्हे), संकेत रामदास खाडे (वय-19 रा. पारवाडी, ता. भोर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत बँकेचे व्यवस्थापक वसंत मारुती साळुंके (Bank Manager Vasant Maruti Salunke) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात (Velha Police Station) फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबवणे येथील जिल्हा बँक आज सकाळी उघडली असता मागील खिडकीची जाळी काढून बँकेत प्रवेश करुन चोरट्यांनी तिजोरीच्या स्ट्राँग रूम मध्ये (strongroom)
प्रवेश केला. मात्र बँकेमधील तिजोरी उघडता न आल्याने बँकेची कोणत्याही प्रकराचे आर्थिक नुकसान झाले नाही.
दरम्यान, वेल्हे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता फुटेजमध्ये आढळलेल्या निरीक्षणावरुन आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली.
चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली होती.

 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addi SP Mitesh Ghatte,),
पोलीस उपअधीक्षक राजेंद्र कदम (Deputy Superintendent of Police Rajendra Kadam) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार (API Manoj Pawar) ,
उपनिरीक्षक महेश कदम (PSI Mahesh Kadam), सहायक फौजदार रावसाहेब गायकवाड, गोपनीय विभागाचे अभय बर्गे, पोलीस हवालदार प्रदीप कुदळे,
पोलीस नाईक ज्ञानदीप धिवार, कांतीलाल कोळपे, विशाल मोरे,
अजय साळुंके यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | ambevane attempted burglary district bank accused were arrested

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘..तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’; अजित पवारांचा इशारा

Kirit Somaiya | ‘मला कळत नाही संजय राऊतांचे आभार मानू की आश्चर्य व्यक्त करू’

Devendra Fadnavis | ‘कर्णधार मोदींच्या नेतृत्वात 100 कोटी लसीकरण पूर्ण’; फडणवीसांनी मानले PM मोदींचे आभार