Pune Crime | खडकवासला धरणात बुडून बिबवेवाडीतील 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) पोहण्यासाठी (Swimming) गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death by Drowning) झाला. योगेश नवनाथ नवले Yogesh Navnath Navale (वय – 18 रा. बिबवेवाडी -Bibwewadi, पुणे मुळ रा.अहमदनगर Ahmednagar) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या (PMRDA Fire Brigade) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी योगेश याचा पाण्यात शोध घेऊन त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. हा प्रकार (Pune Crime) रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला.

 

योगेश हा मूळचा नगर जिल्ह्यातील असून तो कामासाठी पुण्यात आला होता. रविवारी सुट्टी असल्याने तो त्याच्या मित्रांसोबत खडकवासला धरणात पोहण्यासाठी आला होता. त्याच्या मित्रांची हुल्लडबाजी सुरु होती. पोहून आल्यानंतर अंगाला माती लागली म्हणून अंग धुण्यासाठी योगेश पाण्यात गेला होता. मात्र योगेश पाण्यात दिसेनासा झाल्याने त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मुलांचा आवाज ऐकून जवळच कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस (Traffic Police) विलास बांबळे (Vilas Bamble), हवालदार मकसूद सय्यद (Constable Maqsood Sayyad) , होमगार्ड शांताराम राठोड (Home Guard Shantaram Rathod), प्रवीण घुले (Praveen Ghule) आणि विजय भालेराव (Vijay Bhalerao) यांनी घटनास्थळी धाव घेतली.(Pune Crime)

खडकवासला धरणाच्या पाण्यात तरुण बुडाल्याची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे (Haveli Police Station) पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे (Police Inspector Yashwant Nalawade) यांनी नांदेड सिटी अग्निशमन दलाला (Nanded City Fire Brigade) याची माहिती दिली. नांदेड सिटी अग्निशमक केंद्राचे सुजित पाटील, वाहनचालक अभिषेक गोणे, ओंकार इंगवले, फायरमन पंकज माळी, किशोर काळभोर, योगेश मायनाळे, अक्षय काळे, सूरज इंगवले या जवानांनी योगेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान मागील दोन ते तीन दिवसांमध्ये अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | An 18 year old youth from Bibwewadi drowned in Khadakwasla dam

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा