Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना

पुणे : Pune Crime | भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून चौघा अल्पवयीन मुलांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकारात प्रशांत सुरेश कांबळे (वय १८, रा. कुंभारचावडी, धायरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Raod Police) चौघा अल्पवयीन मुलांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धायरीतील भैरवनाथ मंदिरासमोर मंगळवारी रात्री साडेसात वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे, संविधान वंजारी, साहील सुपेकर आणि संतोष पासवान हे चौघे गप्पा मारत बसले होते. तेथेच प्रशांत कांबळे याची भाजीची हातगाडी असते.
संविधान वंजारी याची एका अल्पवयीन मुलाबरोबर भांडणे झाली होती. ते चौघे अल्पवयीन मुले आली.
त्यांनी संविधान वंजारी याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी हे सोडविण्यासाठी मध्ये पडले.
तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना बांबुने मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने ते चार जण पुन्हा तेथे आले.
त्यांना पाहून फिर्यादी व त्यांचे मित्र पळून जाऊ लागले.
तेव्हा त्यांनी प्रशांत याला पकडून कोयत्याने डोक्यात वार करुन त्यांना गंभीर जखमी केले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत. (Pune Crime)

Web Title :- Pune Crime | An attempt to kill a young man by stabbing him in the head, an incident in dhayari pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Health Department | कोरोना काळातील कंत्राटी 597 परिचारिकांसाठी खूश खबर; महाराष्ट्र सरकार करणार कायमस्वरूपी सेवेत रुजू

Pune Police | सर, हम कामकाज देखें क्या? पुण्यातील नवनियुक्त उपायुक्त म्हणाले – ‘दुबारा इधर मत दिखना, छोडूंगा नही’, जाणून घ्या प्रकरण

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश