Pune Crime | रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने INS शिवाजीतील कर्मचार्‍याने महिलेला घातला 6 लाखांना गंडा

पुणे : Pune Crime | रेल्वेमध्ये नोकरीला (Railway Job) लावून देतो, असे सांगून बनावट अपॉईमेंट लेटर (Fake Appointment Letter) दाखवून महिलेची तब्बल 6 लाख रुपयांची लोणावळ्यातील INS शिवाजीमधील कर्मचार्‍याने फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी एका 29 वर्षाच्या महिलेने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात (Lonavala City Police Station) फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी ओमकार सुनिल भावे Omkar Sunil Bhave (रा. कुसगाव, ता. मावळ) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कुरवंडे येथे कँटीन चालवितात. त्यांच्या कँटीनमध्ये आयएनएस शिवाजीमध्ये येणारे सर्व अधिकारी व कर्मचारी येत असतात. त्यात ओमकार भावे हा येत असे.
त्याने ओळखीतून विश्वासात घेऊन कँटीन चालविण्यापेक्षा कोठे तरी सरकारी नोकरी करा, असे सल्ला देऊन भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) नोकरी लावण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो, असे सांगितले.
त्याने अगोदर 18 लाख रुपये सांगितले. तेवढे पैसे नसल्याने त्याने 8 लाखात काम करुन देतो, असे सांगितले.
त्यानुसार त्यांनी नातेवाईक व इतरांकडून पैसे जमा करुन भावे याला 8 लाख रुपये दिले.
त्याने त्याची मैत्रीण रचना सुर्वे ऊर्फ पूर्वा (Rachna Surve alias Purva) ही काम करुन देणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर लॉकडाऊन सुरु झाल्याने त्यांच्याशी केवळ फोनवर बोलणे होत होते.
तो खोटी माहिती देऊन वेळ मारुन नेत होता.
त्यांनी तगादा लावल्याने भावे याने 8 लाख रुपयांपैकी 2 लाख रुपये परत केले.
तसेच विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना भारतीय रेल्वेच्या क्रीम कलरच्या दोन साड्या व काळ्या रंगाचा शुज पाठवून दिला होता.
उरलेले पैसे परत करत नसल्याने शेवटी त्यांनी मिलिटरी इंटेलिजन्सकडे (Military Intelligence) तक्रार केली.
त्यांच्या मदतीने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | An employee of INS Shivaji cheated a woman for Rs 6 lakh on the pretext of a job in the railways

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा