Pune Crime | वीज खंडीत करण्याची भिती दाखवून महिलेला घातला 1 लाखांचा गंडा, बाणेर येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महावितरणमधून (MSEDCL) बोलत असल्याचे सांगून वीज बिल भरले नसल्याने वीज कट करण्याची भिती दाखवून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) एका महिलेला १ लाख रुपयांना गंडा घातला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी बाणेर येथील एका ५७ वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४७५/२२) दिली आहे. हा प्रकार २ नोव्हेबरला साडेनऊ वाजता घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका मोबाईलवरुन फोन करुन महावितरणमधून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांना तुम्ही वीज बिल भरले नसल्याने तुमचे लाईट कनेक्शन रात्री साडेनऊ पर्यंत तोडण्यात येईल, असे सांगितले. पैसे भरण्यासाठी फिर्यादी यांना टीम व्हुअर अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर मोबाईलचे कॅलक्युलेटरवर फिर्यादी यांना त्यांच्या बँकेचा एटीएमचा पिन टाकण्यास सांगितले.
त्यांनी पिन नंबर टाकताच फिर्यादीच्या बँक खात्यातून १ लाख १ हजार १९१ रुपये ट्रान्सफर करुन फसवणुक (Fraud Case) करण्यात आली.

 

पोलीस उपनिरीक्षक चाळके (Sub-Inspector of Police Chalke) अधिक तपास करीत आहेत.
महावितरणाच्या नावाने होणार्‍या फसवणुकीपासून सावधान महावितरणकडून कोणीही कधी बिल भरण्यासाठी फोन करुन कळविले जात नाही.
तसेच कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. सायबर चोरट्यांच्या अशा फसवणुकीला (Cheating Case) कोणी भुलू नये.
कोणत्याही कॉलला प्रतिसाद देण्यापूर्वी महावितरणच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | An incident in Baner where a woman was extorted Rs 1 lakh for fear of power cut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CCL | सीसीएलकडून पुण्‍यामध्‍ये वनस्‍पती-आधारित मांस उत्‍पादनांची श्रेणी लॉन्‍च

Lingayat Community | राज्यस्तरीय उच्च शिक्षीत लिंगायत वधु-वर पालक परिचय मेळावा रविवारी पुण्यात

Gulabrao Patil | ‘सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट’, गुलाबराव पाटलांची जळजळीत टीका