Pune Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरुन मित्रावर कोयत्याने वार, पुण्याच्या कर्वेनगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ओळखीच्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्रावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) कर्वेनगर (Karve Nagar) भागात घडली आहे. याप्रकरणी आरोपी मित्रावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी निलेश श्रीधर ताटे (वय-35 रा. कर्वेनगर) याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विकास सुनील कांबळे (Vikas Sunil Kamble) याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास कांबळे याचे ओळखीच्या महिलेसोबत अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याचा संशय आरोपी निलेश ताटे याला होता.
याच संशयावरुन आरोपी ताटे याने फिर्य़ादी याला शिवीगाळ केली.
तसेच सोबत आणलेल्या कोयत्याने कांबळे याच्या हातावर वार केले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | An incident in Pune’s Karvenagar area where a friend was stabbed with a knife on suspicion of having an immoral relationship

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | अश्लील व्हिडिओ दाखवून बागेत खेळणाऱ्या शाळकरी मुलीचा विनयभंग; खडकी परिसरातील घटना

Pune Anand Nagar SRA Scheme | आनंदनगर येथील एस.आर.ए. रद्द होण्याला विकसकासोबत अन्य घटक कारणीभूत !

Ajit Pawar | अजित पवार पुन्हा पक्षावर नाराज आहेत का? पत्रकार परिषद घेऊन दिले स्पष्टीकरण