Pune Crime | पुण्यात बंगला बांधून देण्याच्या आमिषने वृद्धाची पावणे दोन कोटींची फसवणूक; महिलेसह 4 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंगलो प्लॉटवर (bungalow plot) बंगला बांधून देण्याचे आमिष दाखून पुण्यातील (Pune Crime) एका वयोवृद्ध व्यक्तीला पावणे दोन कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पुण्यातील (Pune Crime) वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत घडला असून पोलिसांनी एका महिलेसह चारणांवर फसवणुकीचा (fraud) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

अरविंदभाई लालजीभाई पटेल (Arvindbhai Laljibhai Patel), अल्पेश अरविंदभाई पटेल (Alpesh Arvindbhai Patel), हेलत अल्पेश पटेल (Helath Alpesh Patel), सुधाबेन अरविंद पटेल Sudhaben Arvind Patel (सर्व रा. मगरपट्टा, हडपसर) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी नंदकुमार हुकमतराय मोटवानी Nandkumar Hukmatrai Motwani (वय-80 रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा (Pune Crime) दाखल झालेल्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या प्लॉवर बँकेचे कर्ज आहे.
ही बाब त्यांनी तक्रारदार यांच्यापासून लवपून ठेवली. तसेच त्यांना प्लॉटवर बंगला बांधून देण्याचे आमिष दाखवले.
यासाठी मध्यस्थ व एजंट म्हणून भूमिका घेत आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून 1 कोटी 65 लाख रुपये घेतले.
2015 पासून आजपर्यंत आरोपींनी तक्रारदार यांना बंगला बांधून दिला नाही. तसेच त्यांच्याकडून घेतलेली रक्कम परत केली नाही.
आरोपींनी तक्रारदार यांच्याकडून घेतलेली रक्कम स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी व्यवसायात गुंतवली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव (API Jayant Jadhav) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | An old man was cheated of Rs 2 crore by the lure of building a bungalow in Pune; FIR against 4 persons including a woman

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirit Somaiya | ‘तुम्ही पाप केले, तुम्ही घोटाळे केले तर कबुल करा’ – सोमय्यांचा अजित पवारांना टोला

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज; जाणून घ्या इतर आकडेवारी

Earn Money | 25 हजार गुंतवून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 3 लाख रुपयांची कमाई; सरकार देईल 50% मदत