Pune Crime | अन् तिने सोपवले चोरट्याच्या हाती गंठण; फ्रिजचे रोख पैशांचे आमिष पडले महाग

पुणे : Pune Crime | लॉटरी लागल्याचे सांगून त्याचे कुपन घेण्यासाठी चोरटा एका महिलेला हॉटेलमध्ये घेऊन गेला. बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील गंठणचे वजन केल्यानंतर तुम्हाला फ्रिजचे रोख पैसे देतो, असे सांगून त्यांच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे गंठण घेऊन चोरटा पळून गेला. (Pune Crime)
याप्रकरणी आंबेगावातील दत्तनगर येथील एका ५७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना जांभुळवाडी (Jambulwadi, Pune) येथील हॉटेल स्वाद येथे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे जांभुळवाडी रोडच्या कडेला दुकान आहे. त्या दुकानात असताना एका माणूस तेथे आला. तुम्हाला लॉटरी लागली आहे़ लॉटरीमध्ये टिव्ही, स्कुटी, फ्रिज या वस्तू लागल्या आहेत. त्या तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कुपन घेण्यासाठी यावे लागेल, असे सांगून त्यांना हॉटेल स्वाद मध्ये घेऊन गेला. त्याने या महिलेला पिण्यासाठी पाणी दिले.
परंतु तिने मला पाणी नको आहे. लॉटरीचे कुपन दे, असे सांगितले.
त्यानंतर त्याने तिला बोलण्यात गुंतवून गळ्यामध्ये असलेले सोन्याचे गंठण काढून देण्याची मागणी केली.
त्यावेळी तिने ते देणार नाही, तुला सोन्याचे गंठण कशासाठी पाहिजे आहे, असे विचारले.
त्यावर त्याने त्याचे वजन करावयाचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला फ्रिजचे रोख रक्कम देणार आहे, असे सांगितले.
त्यावर महिलेने विश्वास ठेवून गळ्यातील ७५ हजार रुपयांचे अडीच तोळ्याचे गंठण काढून त्याच्या हातात दिले.
त्यानंतर त्याने हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांकडे हात करुन ते लोक पैसे देतील, असे सांगून वजन करुन येतो,
असे सांगत तो तेथून निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे
या महिलेच्या लक्षात आले. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | And she entrusted the bundle to the thief; The lure of fridge cash is expensive
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Laxman Jagtap Passed Away | भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन