Pune Crime | दरोड्याच्या तयारीतील आंध्र प्रदेशातील टोळी जेरबंद

पुणे : Pune Crime | गणेशोत्सवात (Ganeshotsav) चोर्‍या, जबरी चोरी, दरोडे टाकण्यासाठी आलेल्या आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) येथील एका टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट १ (Pune Police Crime Branch Unit 1) च्या पथकाने जेरबंद केले आहे. (Pune Crime)

मिनावत नाईक Minawat Naik (वय ३१), फिलीप समुद्रला Philip Samudrla (वय ३२), गुंजा गिड्डीना Gunja Giddina (वय ३६) आणि विसादु नायक Visadu Naik (वय २९, सर्व रा. आंध्र प्रदेश) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक शशीकांत दरेकर (Shashikant Darekar) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४३/२२) दिली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराचे मागील भिंतीलगत रविवारी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime)

गणेशोत्सवात चोरी करणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेतील युनिट एक चे पथक गस्त घालत असताना
ओंकारेश्वर मंदिराचे मागे काही जण जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन चौघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सत्तुर, सेल्फ डिफेन्स स्प्रे,
नायलॉन दोरी अशी घातक हत्यारे मिळून आली. ते दरोडा टाकण्याच्या तयारी होते.
त्याअगोदरच पोलिसांनी त्यांना जेरबंद केले असून सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर (API Kavthekar) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Andhra Pradesh gang jailed for robbery

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rain in Maharashtra | राज्यात पावसाचा जोर वाढणार, गणपती विसर्जन मुसळधार पावसात; हवामान खात्यानं नेमकं काय म्हटलं?

 

Gold Price Today | सोने-चांदीत तेजी, सोने 113 रुपयांनी महागले, चांदीच्या किमतीत 428 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे नवीन दर