Pune Crime | नवरात्रोत्सवात फोटो काढल्याच्या राग, दोन गटात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नवरात्रोत्सवात (Davratriutasav) दांडिया (Dandiya) खेळताना फोटो काढल्याच्या रागातून दोन गटात मारामारी झाल्याची घटना ३० सप्टेंबरला रात्री दहाच्या सुमारास वारजेतील विठ्ठनगर परिसरात घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. (Pune Crime)

दांडिया खेळत असताना फोटो काढल्याचा राग आल्यामुळे १०० ते १५० जणांनी श्रमिक हक्क आंदोलनाचे अध्यक्ष युवराज बगाडे Yuvraj Bagade (वय ४४, रा. शनिवार पेठ) यांना मारहाण (Beating) केली. त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला. याप्रकरणी १०० ते १५० जणांविरूद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रायकर (Assistant Police Inspector Raikar) तपास करीत आहेत. (Pune Crime)

संगीत खुर्चीचा खेळ सुरू असताना युवराज बगाडे याने महिला व मुलींचे फोटो काढल्याचा जाब विजया गलांडे Vijaya Gallande (वय ४०) यांनी विचारला.
त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाल्याने आरोपींनी महिलेसह पतीला मारहाण केली.
त्याशिवाय इतर महिलांचा खाली पाडून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी युवराज बगाडे, मकरंद पवार, मनोज वाघमारे, श्रावणी बुवा, धनश्री मांदळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वारजे पोलीस (Warje Police) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Anger of taking photos during Navratri festival, clash between two groups, conflicting case filed crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Electric Scooter Battery Blast In Mumbai | धक्कादायक! इलेक्ट्रिक बाइकमधील बॅटरीच्या स्फोटात 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Pune Chandni Chowk Traffic Start | चांदणी चौकातील वाहतूक साडे अकरा तासांनी पूर्ववत

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क