Pune Crime | मारहाण केल्याचा राग आल्याने सख्या भावाने केला भावाचा खून

पुणे / राजगुरूनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील खेड (Khed) तालुक्यातील वाडा येथील सख्या भावानेच सख्या भावाचा खुन (Murder) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मासे शिजवून देण्यास नकार दिल्यामुळे ही अशी धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळच्या दरम्यान घडली आहे. शंकर मारूती वाडेकर (वय, 55) असे खुन (Pune Crime ) झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर, राजेंद्र मारुती वा़डेकर (वय, 45, रा. वाडा ता. खेड) असे आरोपीचे (लहान भाऊ) नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र वाडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

याबाबत अधिक माहीती अशी, येथील खेड तालुक्यातील वाडा येथे वाडेकर कुंटुंब वास्तव्यास आहेत. तर, शंकर वाडेकर (Shankar Wadekar) याने मासे बनवण्यासाठी वृद्ध आईला सांगितले होते. परंतु, आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे वृध्द आईने मासे शिजविण्यास नकार दिला. हाच राग मनात धरुन शंकर वाडेकर यांने आईस शिविगाळ आणि मारहाण देखील केली. हा सर्व प्रकार शंकर वाडेकर यांचा सख्खा भाऊ राजेंद्र वाडेकर (Rajendra Wadekar) याला समजल्यावर त्याला राग आला. यानंतर संतप्त राजेंद्रने शंकर याला पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीतच शंकर वाडेकर याचा जागीच मूत्यू झाला आहे.

या दरम्यान, खेड पोलीस स्टेशनचे (Khed Police Station) पोलीस निरीक्षक सतिश गुरव
(Police Inspector Satish Gurav) यांनी याबाबत माहीती दिली आहे की, प्रथमदर्शनी हा
खुनच वाटत आहे. शवविच्छेदन केल्यावरती नक्की काय प्रकार हे समजेल, या घटनेचा पंचनामा
पोलिसांनी सुरू केला असुन राजेंद्र वाडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास
सहाय्यक पोलिस निरिक्षक भारत भोसले (API Bharat Bhosle) करत आहे.

हे देखील वाचा

LPG Connection | कुटुंबात कुणाकडे असेल LPG कनेक्शन, तर तुम्हाला सुद्धा मिळेल नवीन कनेक्शन; जाणून घ्या ‘या’ सुविधेबाबत

Pune Police | पुण्यातील पोलिस निरीक्षकानं इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावल्यानं प्रचंड खळबळ; समर्थ पोलिस ठाण्यात ‘नोंद’

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Angered by the beating, brother killed his brother, shocking incident in Khed taluka of pune dirstrict

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update