Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाला 50 लाखाची खंडणी मागणाऱ्या आणखी एकाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या उद्योगसमूहाच्या एका कंपनीने घेतलेल्या कर्जामध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा बनाव रचून आयकर विभागाची (Income Tax Department) चौकशीची धमकी देऊन प्रकरण मिटवण्यासाठी 50 लाखाची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला होता. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या युनिट एकने (Branch Police) आणखी एकाला अटक केली आहे. संतोष राठोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेने यापूर्वी रुपेश चौधरी याला अटक केली आहे.

 

रुपेश ज्ञानोबा चौधरी Rupesh Gyanoba Chaudhary (वय-46 रा. प्लॅट नं. बी/303, तिसरा मजला, पाटे संस्कृती, सहकारनगर नं. 2), अमित मिरचंदानी (Amit Mirchandani), विकास भल्ला (Vikas Bhalla), संतोष राठोड (Santosh Rathod) व इतर आरोपींवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (vishrambaug police station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. रुपेश चौधरी याला गुन्हे शाखा युनिट एकने 8 ऑक्टोबर रोजी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आज (गुरुवार) संतोष कपुरचंद राठोड (वय-48 रा. पॉप्युलर अपार्टमेंट, शाहु चौक पुणे) याला घोरपडी पेठेतून अटक करण्यात आली. हा प्रकार शनिवार पेठेतील (shaniwar peth) अमिर मिरचंदानी च्या कार्यालयात 22 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता घडला आहे. याप्रकरणी 43 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली असून या गुन्ह्याचा (Pune Crime) तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहे.

 

गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार अशोक माने (Ashok Mane) व शशिकांत दरेकर (Shashikant Darekar) यांना संतोष राठोड हा घोरपडे पेठेत नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता रविवार (दि.24) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये आरोपींनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली एक बीएमडब्ल्यू (BMW) कार व मोबाईल असा एकूण 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतीश भालेकर,
विजेसिंग वसावे, अशोक माने, शशिकांत दरेकर, अमोल पवार यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Another arrested for demanding Rs 50 lakh ransom from Pune businessman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | पहिल्या ‘इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे 23 ऑक्टोबर पासून आयोजन

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 89 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी