Pune Crime | 3 लाखांची खंडणी घेणार्‍या RTI कार्यकर्ता सुधीर आल्हाटसह 5 जणांवर आणखी एक गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | माहिती अधिकाराखाली माहिती मागवून तिच्याद्वारे लोकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी (Ransom) उकळणार्‍या सुधीर आल्हाट (Sudhir Alhat) व त्याच्या साथीदारांविरुद्ध आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी प्रसाद मोहन घारे (वय ३३, रा. हडपसर) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११७/२२) दिली आहे. त्यानुसार कोथरुड पोलिसांनी सुधीर आल्हाट (रा. शिवाजीनगर), अर्चना दिनेश समुद्र, रोहन दिनेश समुद्र, दिनेश विद्याधर समुद्र (रा. कोथरुड) आणि रवी वणगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून माहिती काढून रवींद्र बर्‍हाटे व त्याच्या साथीदारांनी अनेकांना कोट्यवधींना लुटले. त्यांच्याविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. बर्‍हाटे टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे स्वत:ला माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणवून घेणार्‍या सुधीर आल्हाट व त्याच्या साथीदारांवर तीनहून अधिक गुन्हा दाखल झाले आहेत. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची कोथरुडमधील महात्मा सोसायटी येथे जागा असून तेथे होणार्‍या बांधकामाबाबत अर्चना समुद्र, रोहन आणि दिनेश समुद्र यांनी सदनिकाधारकांकडून १४ लाख रुपये घेऊन सर्व आरोपींनी संगनमत करुन कागदपत्रे तयार केली.
महानगरपालिकेत तक्रारी अर्ज करुन बनावट गुंठेवारी प्रतीच्या आधारे त्यांना बांधकाम पाडण्याची भिती दाखविली.
त्यांच्याकडून जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ या दरम्यान ५० लाख रुपयांची खंडणी मागितली.
समुद्र कुटुंबियांनी २ लाख ५० हजार आणि ५० हजार रुपये गुगल पे द्वारे स्वीकारले.
पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Another case was registered against 5 persons including RTI activist Sudhir Alhat who took a ransom of Rs 3 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा