पुणे / पिंपरी : Pune Crime | पुण्यात फरासखाना (Faraskhana Police Station) तसेच वानवडी (Wanwadi), लष्कर (Lashkar) पोलीस ठाण्यात फसवणूकीचे (Cheating) गुन्हे दाखल झालेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB चा पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) याच्याविरुद्ध आता भोसरी (Bhosari) पोलीस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजयकुकमार सिद्धलिंग कानडे (वय ३३, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे २०१५ मध्ये नोकरीच्या शोधात असताना त्यांनी नोकरीसाठी ऑनलाईन अॅप्लीकेशन केले होते. त्यादरम्यान वेगवेगळ्या जॉब पोर्टल साईटवरुन नोकरीसाठी ऑफर येत होत्या. त्यावेळी फिर्यादीस शिवा इंटरनॅशनल यांच्याकडून २१ मार्च २०१५ रोजी फिर्यादीचा मेल आयडीवर मेल आला होता. त्यामध्ये त्यांनी परदेशात हॉटेल मॅनेजमेंटमध्ये नोकरी असल्याबाबत नमूद करण्यात आले होते व बायोडाटा पाठविण्याबाबत सांगितले होते.
त्यामुळे फिर्यादी यांनी शिवा इंटरनॅशनलच्या आयडीवर बायोडाटा पाठविला होता. त्यानंतर किरण गोसावी याने फिर्यादीस बुनेई येथे नोकरी लावतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. नोकरी लावण्यासाठी फिर्यादीला नाशिक फाटा येथे भेटून ३० हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. त्यानंतर फिर्यादी शिवा इंटरनॅशनल याच्या घोडबंदर रोड येथील कार्यालयामध्ये जाऊन ५ एप्रिल २०१५ रोजी आरोपीकडे ४० हजार रुपये रोख भरले होते. किरण गोसावी याच्या सांगण्यावरुन फिर्यादीने सांगितलेल्या बँक खात्यावर २० हजार पाठविले होते. मेडिकल करण्यासाठी किरण गोसावी याचे ठाणे येथील कार्यालयात जाऊन १० हजार रुपये भरले होते. फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख २५ हजार रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक केली, म्हणून गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक महाजन तपास करीत आहेत.
Hybrid Fund | ‘हायब्रिड फंड’ कशाला म्हणतात, जाणून घ्या त्यामधील गुंतवणुकीचे फायदे?