Pune Crime | 10 % दराने व्याज वसूल करुन 2.5 लाखाची खंडणी उकळणार्‍या सावकारास आणि त्याच्या साथीदारांना खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करुन देखील अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या खासगी सावकाराच्या (private money lender) आणि त्याच्या साथिदाराच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक – 2 ने (Anti extortion cell) मुसक्या आवळल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) कॅम्प परिसरात (camp area) आज (मंगळवार) केली आहे.

खासगी सावकार ज्ञानेश्वर किसन पवार Dnyaneshwar Kisan Pawar (वय-42 रा. स.नं.315, वैदूवाडी, हडपसर) त्याचा साथिदार ओंकार संदिप तिवारी Omkar Sandeep Tiwari (वय-23 रा. स.नं.61/1 शिवनेरी नगर, कोंढवा खु. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना सापळा रचून अटक (Arrest) करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव धायरी येथील तक्रारदार हे परप्रांतीय असून ते पीओपी (POP) बनवून देण्याचे काम करतात.
त्यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी खासगी सावकार ज्ञानेश्वर पवार याच्याकडून 1 लाख 95 हजार रुपये कर्ज घेतले होते.
त्याबदल्यात तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे 2 लाख 45 हजार रुपये परत केले होते.
मात्र आरोपी पवार याने तक्रारदार यांच्याकडे प्रतिमहीना 10 टक्के प्रमाणे पैशांची मागणी केली.

पवार याने तक्रारदार यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावून 4 लाख 25 हजार रुपये घेतले.
एवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने आणखी पैशांसाठी दमदाटी करुन 2 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली.
खासगी सावकाराच्या त्रासाला वैतागून तक्रारदार यांनी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रारी अर्ज केला.

 

तक्रारी अर्जानुसार आज पथकाने पुणे कॅम्प परिसरात सापळा रचला.
तक्रारदार यांच्याकडून ज्ञानेश्वर पवार याचा साथिदार ओंकार तिवारी याला 2 लाख 50 हजार रुपयांची खंडणी स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले.
आरोपींविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे (Addl CP Ashok Morale), पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 लक्ष्मण बोराटे
(ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अमलदार संपत अवचरे, प्रदिप शितोळे, विजय गुरव, सौदाबा भोजराव, शैलेश सुर्वे,
सुरेंद्र जगदाळे, विनोद साळूंके, सचिन अहिवळे, अमोल पिलाणे, संग्राम शिनगारे, राहुल उत्तरकर,
प्रविण पडवळ, प्रदिप गाडे, मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर व आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime | Anti extortion cell of pune police arrests moneylender and his accomplices for extorting Rs 2.5 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | मंगळवार पेठेतील कै. भागुजीराव बारणे शाळा स्थलांतरीत करू नये; शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे यांची मागणी

New Labour Code | 1 ऑक्टोबरपासून बदलणार कामगार कायदा, इनहँड सॅलरीवर होणार परिणाम, 12 तास काम!

Anti-Corruption | इचलकरंजीत 3 लाखाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप