Pune Crime | सावकारीच्या गुन्ह्यात खंडणी विरोधी पथक-2 कडून कात्रज मधील बिल्डर उमेश मांगडे अन् पिसोळीच्या माजी सरपंच नवनाथ मासाळ विरुद्ध गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जागा खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला 10 लाख रुपये कर्ज देऊन त्यांची मर्सिडीज कार गहाण ठेवून व्याजाची रक्कम (Interest Amount) काढून घेत कर्ज दिले. यानंतर आणखी 33 लाख रुपये खंडणी (Extortion Case) मागणाऱ्या कात्रज येथील मांगडेवाडीचे माजी सरपंच (Mangdewadi Former Sarpanch) श्रीहरी मांगडे (Srihari Mangde) यांचा मुलगा आणि पिसोळीचा माजी सरपंच यांच्या विरुद्ध गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-2 (Anti Extortion Cell, Pune) कडून गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

बांधकाम व्यावसायिक उमेश श्रीहरी मांगडे Builder Umesh Srihari Mangde (वय-37 रा. श्रेया कॉम्पलेक्स, मांगडेवाडी, कात्रज) आणि पिसोळीचा माजी सरपंच (Pisoli Former Sarpanch) व पाणी व्यावसायिक नवनाथ ज्ञानोबा मासाळ Navnath Gyanoba Masal (वय-40 रा. माऊली निवास, पिसोळी, ता. हवेली) यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) आयपीसी 386, 387, 452 व महाराष्ट्र सावकारी अधिनियम (Maharashtra Moneylending Act) कलम 39, 45 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत जागा खरेदी विक्री करणाऱ्या 34 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांना व्यावसायासाठी जानेवारी 2020 मध्ये 10 लाख रुपयांची आवश्यकता होती. त्यांनी नवनाथ मासाळ याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी मासाळ याने त्याच्या ओळखीचा सावकार उमेश मांगडे याच्या कात्रज-मांगडेवाडी रोडवरील सृष्टी हॉटेलमध्ये फिर्यादी नेले. नवनाथ मासाळ याने उमेश मांगडे याच्याकडून 10 लाख रुपये 5 टक्के प्रतिमहीना व्याजाने घेऊन फिर्यादी यांना दिले.

पैशांच्या मोबदल्यात आरोपी नवनाथ मासाळ याने फिर्यादी यांची मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) गाडी उमेश मांगडे यांच्याकडे गहाण ठेवली. मांगडे याने व्याजाचे काही हप्ते घेऊन 9 लाख 50 हजार रुपये फिर्यादी यांना दिले. दरम्यान फिर्यादी यांनी 4 लाख 10 हजार रुपये व्याज परत केले नाही. त्यामुळे आरोपींनी संगनमत करुन व्याजावर व्याज आकारणी करुन फिर्यादी यांच्याकडून 1 शॉप व 1 फ्लॅट तारण म्हणून घेतला. शॉप आणि फ्लॅट सोडवण्यासाठी आरोपींनी 33 लाख रुपये खंडणी मागणी करुन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचे फिर्यादीत नमूद केले. खंडणी विरोधी पथक -2 कडून फिर्यादी यांच्या अर्जाची चौकशी करुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale),पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajjanne), पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव
(PSI Mohandas Jadhav), श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan) पोलीस अंमलदार विजय गुरव,
प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, संग्राम शिनगार, सचिन अहिवळे,
सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले,
रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Anti-extortion squad-2 filed a case against builder Umesh Mangde in Katraj and former sarpanch of Pisoli Navnath Masal in the case of moneylender