×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | रुमवर पोरा-पोरींना आणतो, धंदा करतो? API असल्याचे धमकावून तरुणाला...

Pune Crime | रुमवर पोरा-पोरींना आणतो, धंदा करतो? API असल्याचे धमकावून तरुणाला लुबाडले, सिंहगड रोड वरील घटना

पुणे : Pune Crime | महाविद्यालयीन तरुणाला तु रुमवर मुला मुलींना आणूतो, अशी तक्रार असल्याचे सांगून कारवाईची भिती दाखवून एका तथाकथित ‘सहायक पोलीस निरीक्षका’ने (Assistant Inspector of Police) तरुणाकडून २० हजार रुपये घेऊन लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी नर्‍हे येथील एका २० वर्षाच्या तरुणाने सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) फिर्याद (गु़ रजि. नं. ३९१/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असून एका फ्लॅटमध्ये राहतो. ५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता एक जण त्याच्या रुमवर आला. मी खडकी पोलीस ठाण्याचा (Khadki Police Station) एपीआय आहे. तु तुझ्या रुमवर मुला मुलींना आणतो, अशी तुझ्याविरुद्ध तक्रार आली आहे, असे सांगून त्यांना शिवीगाळ केली. फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करण्याची भिती दाखवून फिर्यादीकडून २० हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.

Web Title :- Pune Crime | API lured the young man by threatening that he was running a prostitution business on the room

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

RBI ने रद्द केले पुण्यातील ‘या’ बँकेचे लायसन्स, तुमचे सुद्धा असेल खाते; तर काढू शकणार नाही पैसे

CM Eknath Shinde | मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला? याचे विश्लेषण सामनातील ‘रोखठोक’ सदरातून करा; मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Collector Dr. Rajesh Deshmukh | अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Must Read
Related News