Pune Crime | पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये दोन रिक्षाचालकांमध्ये वाद, तलवारीने वार केल्यानं खळबळ

पुणे (Pune Crime) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मार्केटयार्ड येथे दोन रिक्षा चालकांमध्ये भाडे घेणाऱ्यारून वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्या रिक्षा चालकाचा खून (Murder) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजेंद्र मोहिते (वय 52) (Rajendra Mohite) यांनी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात (market yard police station) फिर्यादी दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक आहेत. गेट क्रमांक चार येथील रिक्षा स्टॉपला ते रिक्षा
लावत असतात. तर आरोपीही रिक्षा चालक (Autorickshaw driver) आहे. दरम्यान, गुरूवारी
सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र यांनी रिक्षा स्टॉपला रिक्षा नंबरला लावला आणि त्यांच्या मित्रासोबत बोलत उभे होते. त्यावेळी आरोपी रिक्षा घेऊन आला. तर त्याने राजेंद्र यांच्या रिक्षा समोर रिक्षा लावत आलेले भाडे मी घेईल. त्यानंतर तू घ्यायचे असे म्हणाला. यामुळे त्यांनी तू माझ्यानंतर नंबरला रिक्षा लाव असे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाले. राजेंद्र याने रिक्षात ठेवलेली लोखंडी तलवार बाहेर काढत साथीदाराला आवाज देऊन फिर्यादी यांच्यावर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक भोसले हे करत आहेत.

हे देखील वाचा

SSC Result 2021 | दहावीच्या निकालाची वेबसाइट क्रॅश, निकाल पाहण्यात अडचणी

Irregular Period Problem | मासिक पाळी येण्यास विलंब होत आहे का? तर घरगुती उपचार करून पहा, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update