Pune Crime | कात्रजमधील कारखान्यात दोन कामगारांचे वाद, एकाच्या खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कात्रज भागात (Katraj) एका कारखान्यात काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये वाद झाल्यानंतर एकाने लाकडी फळी डोक्यात घालून खून करण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना (Pune Crime) घडली आहे.

संजय कुमार रजक (वय 25) असे जखमी झालेल्या या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी नरेंद्र दिनेश कुमार (वय 20) याला अटक केली आहे. याबाबत विठ्ठल जाधव (वय 51) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव यांचा गुजरवाडी येथे कारखाना आहे. त्याठिकाणी खपटांचे
बॉक्स बनविले जातात. येथे गेल्या काही वर्षांपासून हे दोघे काम करतात. दोघेही मूळचे परराज्यातील
आहेत. दरम्यान काम करत असताना त्याच्यात वाद झाले होते. वादातून भांडण झाल्यानंतर रागाच्या
भरात नरेंद्र याने संजय याच्या डोक्यात लाकडी फळी घातली. त्यात संजय हा गंभीर जखमी झाला
आहे. त्याचा डोक्यातच रक्तस्त्राव झाला असून, तो अद्यापही शुद्धीवर आलेला नाही. त्याचे ऑपरेशन झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. नेमका वाद का झाला हे अद्याप समोर आले नसल्याचे
पोलिसांनी सांगितले आहे. नरेंद्र याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने
त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अविनाश धमे हे करत आहेत.

हे देखील वाचा

Gold Price Today | सोने 150 रुपये तर चांदीच्या दरात 600 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे बाजारभाव

Pune Corporation | जायका कंपनीला मनपाकडून काढण्यात येणार्‍या निविदातील अटीशर्ती मान्य, निविदा प्रक्रिया महिन्याभरात पार पडणार अन् लवकर कामाला होणार सुरूवात

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | Argument of two workers in a factory in Katraj, attempted murder of one

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update