Pune Crime | खेड शिवापूरमध्ये गोळीबार करत ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे / खेड शिवापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हवेली तालुक्यातील खेड शिवापूर या गावातील शिवापूर वाडा येथील श्री गणेश ज्वेलर्स (Shree Ganesh Jewellers) या सोन्याच्या दुकानावर तीन जणांनी सशस्त्र दरोडा (Robbery) टाकला. दरोडेखोरांनी गोळीबार (Firing) करत सोने लुटून पोबारा केला. तसेच या दुकाना शेजारी असलेल्या सलून दुकानावर देखील हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.24) रात्री नऊच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातील (Rajgad Police Station) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी (Pune Crime) धाव घेत पंचनामा केला.

 

पुणे सातारा महामार्गावरील (Pune Satara Highway) खेड-शिवापूरच्या श्री गणेश ज्वेलर्सवर तीन जणांनी दरोडा टाकून सोने लुटून पोबारा केला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथकं रवाना करण्यात आली आहेत. दरोड्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या शोधासाठी श्वान पथकालाही (Dog Squad) पाचारण करण्यात आले आहे. (Pune Crime)

 

दरोडेखोर दुकानात घुसल्यानंतर पिस्तुल (Pistol) दाखवत ज्वेलर्स मधील दोन जणांना बाजू हटीये,
असे म्हणत दुकानातील काऊंटरवरील पाच सोन्याचे डबे घेऊन दुचाकीवरुन पळून गेले.
दरम्यान दुकानाच्या काचा फोडत शेजारी असलेल्या सलुनच्या दुकानातही त्यांनी गोळीबार केला.

घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ (API Nitin Khamgal) तेथे आले.
घडलेला प्रकार लक्षात येताच सुत्रे हलवून पोलीस निरीक्षक सचिन पाटील (Police Inspector Sachin Patil) यांना एकूण सहा आरोपी असल्याचे सांगितले.
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना केली.
दरम्यान भोरचे पोलीस उपविभागीय अधिकारी (Bhor Police Sub-Divisional Officer) धनंजय पाटील (Dhananjay Patil) यांनी पाहणी करुन तपासाच्या सूचना केल्या.

 

Web Title :- Pune Crime | Armed robbery at a jeweler’s shop with gunfire in Khed Sivapur, huge excitement in pune district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांची वर्षातून 3 वेळा तपासणी

 

Pune Crime | बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर काढले 2 कोटींचे कर्ज; प्रॉपर्टीवर, पुण्यातील व्यावसायिकाची फसवणुक

 

Police Recruitment Exam Scam | पोलीस भरती परीक्षा घोटाळ्यातील 6 रॅकेटचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 56 जणांना अटक