Pune Crime | बीट मार्शलला विटेने मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दारुच्या नशेत रस्त्यामध्ये गोंधळ घालणाऱ्या तरुणाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर (police officer) हल्ला करुन डोक्यात वीट मारल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) घडला आहे. हा प्रकार चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनच्या (chaturshringi police station) हद्दीतील पांडव नगर पोलीस चौकीसमोर (Pandav Nagar Police chowki) रविवारी (दि.26) रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक (Arrest) केली आहे.

केशव बसवराज कांबळे Keshav Basavaraj Kamble (वय-25 रा. मरगम्मा देवी मंदिर शेजारी, पांडवनगर पोलीस चौकी समोर, पांडवनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक महेंद्र तुकाराम करगळ Mahendra Tukaram Kargal (वय-38) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव कांबळे हा पोलीस चौकीसमोर दारु किंवा त्यासारख्या अंमली पदार्थाचे सेवन करुन गोंधळ घालत होता.
त्यावेळी फिर्यादी महेंद्र करगळ हे त्याला गोंधळ घालू नकोस असे समजावून सांगत होते.
त्यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ करत प्लास्टिकची खुर्ची उचलून अंगावर धावून गेला.
करगळ यांनी त्याला पकडून चौकीच्या बाहेर आणले असता त्याने बाजूला पडलेली विट उचलून त्यांच्या डोक्यात मारुन (Pune Crime) जखमी केले.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Arrest of a young man who beat Beat Police Marshall with a brick

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्याच्या कोंढव्यात 27 वर्षीय तरूणीचा दोघांकडुन विनयभंग

Maharashtra Rains | आगामी 48 तासांत महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा; पुण्यासह ‘या’ जिल्हांना ‘अलर्ट’

Jayant Patil | ‘धनंजय मुंडेंना पुढच्या 10 निवडणुका कोणी हरवू शकत नाही’ – जयंत पाटील