Pune Crime | बेकायदा सावकारी करणाऱ्या खासगी व्यवसायिकास अटक; गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेकायदा सावकारी करणाऱ्या एका खासगी व्यवसायिकास (Pune Crime) पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. कैलास उर्फ अप्पा बाबुराव बिबवे kailash baburao bibve (रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने (anti extortion cell) केली आहे. याप्रकरणी बिबवेविराेधात सावकारी अधिनियम कलमानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, फिर्यादीदाराला पैशांची आवश्यकता होती. फिर्यादीने कैलास बिबवे (Kailash Bibve) याच्यांकडून मार्च 2018 मध्ये 25 हजार रुपये घेतले होते. बिबवेने त्याला 10 टक्के व्याजदराने पैसे दिले होते. फिर्यादी व्यावसायिकाने त्याला दरमहा व्याज देखील दिले होते. त्यानंतर बिबवे हे फिर्यादीदाराकडे आणखी पैसे देण्याचे मागणी करत होता. मूळ मुद्दल तसेच व्याजाची परतफेड केल्यानंतरही बिबवे धमकावत होता. तसेच दमदाटी देत होता.

दरम्यान, यानंतर फिर्यादी व्यावसायिक या त्रासाला कंटाळून अखेर त्याने पोलिसांत धाव घेतली.
आणि बिबवेविरोधात तक्रार दाखल केली आहे. यानंतर खंडणी विरोधी पथकाने कैलास बिबवे यास ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, सदरची कारवाई खंडणी विरोधी पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (PI Balaji Pandhare)
यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), संपत ओैचरे (Sampat Ochre), सुरेंद्र जगदाळे (Surendra Jagdale), शैलेश सुर्वे (Shailesh Surve) विनोद साळुंके (Vinod Salunke), विजय गुरव (Vijay Gurav), राहुल उत्तरकर (Rahul Uttarkar) यांनी केली आहे.

Web Title :- Pune Crime | Arrest of private businessman for illegal money lending; Action of Crime Branch extortion cell

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ashok Chavan | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरुन अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘त्यांना एवढी माहिती कुठून मिळते..’

Saral Bachat Bima Plan | 5 ते 7 वर्षापर्यंत भरा प्रीमियम आणि 12 ते 15 वर्षापर्यंत कुटुंबाला मिळेल पूर्ण संरक्षण

Pune News | कात्रज तलावाजवळील ‘स्मार्ट पदपथाचे’ काम वर्षभरापासून रखडले; अर्धवट कामावरून नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा