Pune Crime | भागीदारीतील पैसे मागितल्याने पिस्तुलाचा धाक दाखवून दिली जीवे मारण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भागीदारीमध्ये सुरु केलेल्या व्यवहारातील पैसे मागितल्याने पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी मनोज हिम्मतलाल शहा (वय ५२, रा. हाईड पार्क, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०२/२२) दिली आहे. त्यानुसार, जयंतीलाल ताराचंद ओसवाल, प्रवीण ताराचंद ओसवाल आणि राकेश ताराचंद ओसवाल (सर्व रा. मुकुंदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार न्यू टिंबर मार्केट व गंगाधाम येथे २००६ ते मार्च २०२० दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहेत. त्यांनी मिळून घोरपडी मुंढवा येथील सर्व्हे नं. ३८, हिस्सा नं. ५/बी घोरपडी येथी जागेसाठी त्यांनी भागीदारी स्वरुपात व्यवहार केला होता. आरोपींनी फिर्यादीकडून ४५ लाख रुपये ३० टक्के भागीदारी स्वरुपात घेतले. २०१८ मध्ये वरील व्यवहारातील अंदाजे ३३ गुंठे जागा २० कोटी ५० लाख रुपयांना विकली. ठरल्याप्रमाणे फिर्यादी यांना ३० टक्के भागीदारीप्रमाणे ६ कोटी १५ लाख रुपये देणे आवश्यक होते. त्याऐवजी ४.८७८ टक्के प्रमाणे रजिस्ट्रेशन करुन फक्त १ कोटी रुपये दिले. इतरही व्यवहारामध्ये ठरल्याप्रमाणे सर्व मिळून १७ कोटी २० लाख १२ हजार ७५० रुपये न देता फिर्यादीची फसवणूक केली. याबाबत फिर्यादी मनोज शहा यांनी वारंवार विचारणा केली असताना ‘‘मी तुला पैसे देत नाही,’’ असे सांगितले. मार्च २०२० मध्ये जंयतीलाल ओसवाल हे शहा यांच्या ऑफीसजवळून जात असताना त्यांनी पुन्हा पैशांबाबत विनवणी केली.
तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना गाडीमध्ये बसवले. त्यांच्याजवळील पिस्तुल दाखवून ‘‘परत पैसे मागितले तर, जीवे मारुन टाकीन’’ अशी धमकी दिली.

या प्रकाराने मनोज शहा घाबरुन गेले होते. त्यांनी गुन्हे शाखेकडे (Pune Police Crime branch) तक्रार अर्ज केला होता.
या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटोळे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Asking for money from the partnership, he threatened to kill himself with a pistol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

 

CM Eknath Shinde | राजकीय क्षेत्रात खळबळ ! CM एकनाथ शिंदेंच्या PA कडून धमकीचा फोन?,

 

Aditya Thackeray On Shivsena Rebel MLA | शिवसेनेचे बंडखोर आमदार विधान भवनात दाखल होताच आदित्य ठाकरे म्हणाले – ‘कसाबलाही असं आणलं नसेल’