Pune Crime | गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने भररस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडली, दोघांना अटक

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत असताना पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना पुण्यात (Pune Crime) अनेक ठिकाणी घडत आहेत. अशीच एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. रस्त्यात गाडी आडवी लावल्याने गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने गणवेशातील पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) कॉलर पकडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad police station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.26) दुपारी सव्वाबाराच्या सुमारास थेरगाव येथील कैलासनगर (Pune Crime) येथे घडली.

नरेश पारख Naresh Parakh (वय-40) व धमेंद्र पारख Dhamendra Parakh (वय-40) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अशोक बाळु जगताप (PSI Ashok Balu Jagtap) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप (PSI Ashok Jagtap) हे दखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांचा
तपास करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची स्कोडा गाडी (एमएच 14 एफजी 2800) रस्त्यामध्ये लावल्याने वाहतुकीस अडथळा (Obstruction of traffic) निर्माण झाला होता.
त्यामुळे ते वाहन रस्त्याच्या कडेला घेण्याबाबत फिर्यादी आरोपींना समज (Pune Crime) देत होते. त्यावेळी फिर्यादी यांनी पोलिसांचा शासकीय गणवेश परिधान केला होता.
असे असतानाही आरोपींनी फिर्यादीच्या गणवेशाची कॉलर (Uniform collar) पकडून घटनास्थळी भेट देण्यापासून फिर्यादीला परावृत्त केले.
तसेच शासकीय कामात अडथळा केला.
पुढील तपास वाकड पोलीस (Wakad Police) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Asking to pull over, he grabbed the collar of a police officer and arrested the two

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

NDA Cadet Dies in Pune | एनडीएमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे लष्कर न्यायालयाचे आदेश

Pune Crime | घटस्फोटीत पती आणि प्रियकराच्या त्रासाने महिलेने केली गळफास लावून आत्महत्या; पुण्याच्या येरवडयातील घटना

Maruti Alto 800 झीरो डाऊन पेमेंटवर 90 हजारात खरेदी करा, कंपनी देईल वॉरंटीसह मनीबॅक गॅरंटी