Pune Crime | टेम्पो मागे घेण्यास सांगितल्याने गुंडाच्या टोळक्याने कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण; पिसोळी येथील घटनेत तिघा सराईतांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | महावितरणची (Mahavitaran) केबल टाकण्याचे काम सुरु असताना टेम्पो साईडला घेण्यासाठी सांगितल्याने गुंडाच्या टोळक्याने कामगारास लाकडी बांबु, लोखंडी रॉड, लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. त्यात हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून तो बेशुद्धावस्थेत आहे. (Pune Crime)

अक्षय नवणे (वय २३, रा. पिसोळी) असे या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अल्ताफ सलीम शेख (वय १८, रा. बालाजीनगर, धनकवडी), राजकुमार शामलाल परदेशी (वय २४) आणि सुफियान बशीर शेख (वय १८, रा. बालाजीनगर, धनकवडी) या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) असून त्यांच्या इतर ३ साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी स्वप्नील बाळासाहेब मासाळ (वय ३१, रा. पिसोळी गावठाण, पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पिसोळीमधील इंडस्ट्रीयल झोनमधील मोहन मार्बल वेअर हाऊसकडे जाणार्‍या गल्लीमध्ये शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रीयल झोनमध्ये महावितरणची अंडर ग्राऊंड केबल टाकण्याचे काम सुरु होते. या कामाची देखभाल कामगार अक्षय नवणे हे करत होते. या ठिकाणी रस्त्यावर एक टेम्पो उभा होता. अक्षय याने टेम्पोचालकाला टेम्पो रोडवरुन साईडला घे, असे सांगितले. याचा राग येऊन टेम्पोचालकाने सराईत गुन्हेगारांच्या मदतीने अक्षय नवणे यांना लाकडी बांबु, लोखंडी रॉड, पाईपने डोक्यात व पाठीवर, हातावर बेदम मारहाण केली. यात अक्षय बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना अटक केली आहे. अक्षय याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून अजूनही तो बेशुद्धावस्थेत आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे तपास करीत आहेत.

 

web title : Pune Crime | Asking to reverse the tempo, the mob beat the worker until he fell unconscious; Three inmates arrested in Pisoli incident kondhwa police arrest three

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा