Pune Crime | लोन अ‍ॅपद्वारे बदनामी करणार्‍यांमध्ये आता आसामाच्या महिला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोन अ‍ॅपद्वारे (Loan App) ४-५ हजार रुपयांचे विना तारण ऑनलाईन कर्ज (Online Loan) देऊन फसवणुकीबरोबर (Froud Case) बदनामी करणार्‍या सायबर चोरटे (Cyber Criminal) प्रामुख्याने पश्चिम बंगाल (West Bengal), झारखंड (Jharkhand), बिहार (Bihar) राज्यातील असल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले होते. आता त्यात आसाममधील (Assam) तरुणींही अशा फसवणूकीत (Cheating Case) असल्याचे आढळून आले आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी येरवड्यातील एका २५ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७० /२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अपर्णा मजुमदार Aparna Majumdar (रा. कटगन), सधन हरिकृष्ण मजुमदार Sadhan Harikrishna Majumdar (रा. कामरुप सिटी, आसाम) आणि अन्य एका मोबाईल धारकावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार २३ मे ते १८ जून दरम्यान घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी इन्स्टंट पर्सनल लोन अ‍ॅपवरुन (Instant Personal Loan App) २३ मे रोजी ३ हजार व १० जून रोजी ३ हजार ५०० रुपयांचे कर्ज (Loan) घेतले होते. हे कर्ज फेडावे, यासाठी व्हॉटसअपवर (WhatsApp) मेसेज पाठविला. पैसे न भरल्यास त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना फिर्यादीचे फोटो व मेसेज पाठवून फिर्यादीची बदनामी करण्याची धमकी दिली. पैसे भरण्यासाठी वेळोवेळी व्हॉटसअ‍ॅपवर लिंक पाठवून फिर्यादींना ५ हजार ५१० रुपये भरण्यास भाग पाडले.

 

फिर्यादी हे आणखी पैसे भरत नसल्याने व प्रतिसाद देत नसल्याने त्यांच्या
आधारकार्डवरील फोटो (Nude Photos) मॉर्फ करुन एका नग्न महिलेच्या चेहर्‍यावर
चिटकविला फोटो त्यांना पाठवून त्यांचा विनयभंग (Molestation) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक जगताप (Police Inspector Jagtap) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Assam’s female cyber youth now among those defamed by loan app

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | ‘नातवाबरोबर वेळ घालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे 4 तास, पण…’ – एकनाथ खडसे

CM Eknath Shinde | दिल्लीत पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला खासदारांचा आकडा; म्हणाले – ’12 नाही आपले तर 18′

Devendra Fadnavis | ‘पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करणार’ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस