Pune Crime | राज्यस्तरीय खेळाडूच्या बनावट प्रमाणपत्रांवर बनला सहायक पोलीस उपनिरीक्षक, पर्दाफाश झाल्यानंतर पुण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | राज्यस्तरीय खेळाडू (State level players) असल्याबाबतच्या बनावट प्रमाणपत्रांच्या (Fake certificate) आधारे पोलीस दलात नोकरी (Police job) मिळवणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकावर (ASI) पुण्यातील (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फसवणूकीचा (Cheating) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. दिनेश नवनाथ करांडे Dinesh Navnath Karande (रा. बीड) असे बनावट प्रमाणपत्र तयार करुन नोकरी मिळवणाऱ्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दिनेश करांडे सध्या बीड येथील बिनतारी संदेश विभागात कार्यरत (Wireless Messaging Department Beed) आहे. करांडे यांनी 2015-16 मध्ये पोलीस दलात नोकरी मिळवली होती.

अपर पोलिस महासंचालक व संचालक, दळण वळण व परिवहन कार्यालयामार्फत 2015-16 मध्ये रेडिओ यांत्रिकी विभागाची सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती प्रक्रिया (Recruitment) घेतली होती. या भरतीमध्ये करांडे याने 2012 मध्ये झालेल्या राज्य शुटींग बॉल (State Shooting Ball) अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांक मिळवल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. तसेच महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या (Maharashtra Squash Racket Association) 2015 मधील स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याकडून खेळताना पहिल्या क्रमांकाचे, 2015 मध्येच त्याने बीड जिल्ह्याकडून खेळताना तृतीय क्रमांकाचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन सादर केले होते. (Pune Crime)

करांडे याने बनावट प्रमाणपत्र सादर करुन पोलीस दलात नोकरी मिळवली होती. दरम्यान करांडे याने सादर केलेल्या प्रमाणपत्रासंदर्भात संबंधीत स्पर्धकांच्या आयोजकांकडे चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर विभागीय चौकशीमध्ये (departmental inquiry) करांडे हा दोषी आढळून आला. त्यानंतर त्याच्यावर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पवार (API Sandeep Pawar) करत आहेत.

Web Title : Pune Crime | Assistant Sub-Inspector of Police on fake certificates of state level player, FIR in Pune after being exposed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या