Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | एका विवाहित व्यक्तीची पुण्यातील तरुणीसोबत (Pune Young Girl) इन्स्टाग्रामवर (Instagram) ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तरुणीपासून पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवून तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना (Pune Crime)  उघडकीस आली होती. याप्रकरणी सौरभसिंह गोरेसिंह भदोरीया Saurabh Singh Gore Singh Bhadoria (वय-22) याच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात  (Bharati Vidyapeeth Police Station)  गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) करण्यात आली. आरोपीने सत्र न्यायालयात जामिनासाठी केला अर्ज सत्र न्यायाधीश डी.पी. रागीट (Sessions Judge D.P. Ragit) यांनी जामीन अर्ज फेटाळला (Bail Application Rejected) आहे.

 

वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद
सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल (Government Advocate Prem Kumar Agarwal) यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे पीडित पासून लपवून ठेवल्याचे व्हॉट्सअॅप चॅट वरून दिसून येते. तसेच आरोपी हा त्याचे कर्तव्यावरुन सतत गैरहजर राहत असल्याचे व त्याबाबत कार्यालयाला कोणतीही सूचना न दिल्याबाबतचे पत्र आरोपीचे कार्यालयीन प्रमुखांनी दिल्याचेही अगरवाल यांनी न्यायालयाला सांगितले. यामुळे या प्रकरणात पीडितेची शारिरीक सबंध करण्यास असलेली संमती आरोपीने फसवून घेतली. न्यायालयाने सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करुन  आरोपीचा जामीन अर्ज फेटळला.

काय आहे प्रकरण?
पुण्यात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 26 डिसेंबर 2021 ते 9 एप्रिल 2022 या कालावधीत आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथे घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही पुण्यात राहते तर आरोपी हा मध्य प्रदेशातील आहे. आरोपीने त्याच्या इंन्स्टाग्राम प्रोफाईलवर खोटी माहिती टाकून पीडित तरुणीसोबत ओळख वाढवली. (Pune Crime)

 

दोघांमध्ये ओळख वाढल्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.
आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीच्या घरी, गोवा (Goa) आणि मुंबई (Mumbai) येथे नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले.
त्यानंतर 18 मार्च रोजी आरोपी पीडित तरुणीच्या घरी आला. त्याने तरुणीचा विरोध असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने शारीर संबंध ठेवले.
त्यानंतर आरोपीने लग्न न करता तरुणीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Atrocities on young women by showing the lure of marriage, The court rejected the bail application of the accused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dr. Neelam Gorhe | महाराष्ट्र विधान परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सकारात्मक कामांना चालना

 

Pune PMC Election 2022 | प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या जाहीर, सहा प्रभागात महिलांची संख्या अधिक

 

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा