Pune Crime | खंडणी न दिल्याने गुंडांकडून व्यावसायिकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; नर्‍हेमधील घटनेत दोघा सराईतांसह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | नर्‍हे गावात कोयत्याचा धाक दाखवून दुकानदारांना व रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांवर दहशत माजवून खंडणीची मागणी टोळके करीत होते. खंडणी (Ransom) न देता दुकानही बंद न केल्याच्या रागातून गुंडांच्या या टोळक्याने एका व्यावसायिकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime)

 

याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) शिवराज शिंदे (Shivraj Shinde), मन्या ऊर्फ मनोज चांदणे (Manya alias Manoj Chandane), संजय चव्हाण (Sanjay Chavan), निखील इंगळे (Nikhil Ingle) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे (FIR) दाखल (Pune Crime) केले आहेत. शिवराज शिंदे व मन्या चांदणे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (On Record Criminal) असून त्यांच्यासह निखील इंगळे अशा तिघांना अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत अनिल दौलत भुवड (Anil Daulat Bhuvad) (वय ४३, रा. श्रीगणेश एन्क्लेव्ह, नर्‍हे – Narhe) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१०/२२) दिली आहे. फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी हे श्री गुरुदत्तकृपा लॉन्ड्री अँड ड्रायक्लीनर्स (Shri Gurudattakrupa Laundry and Dry Cleaners) या दुकानात शनिवारी रात्री आठ वाजता कपडे इस्त्री करत होते. यावेळी आरोपी हातात कोयते घेऊन आले.  तेथील दुकानदारांना व येणार्‍या जाणार्‍या लोकांना शिवीगाळ करुन कोयत्याचा धाक दाखवून दहशत माजवत होते. खंडणीची मागणी करुन तसेच फिर्यादी यांनी त्यांचे दुकान बंद केले नाही. याचा राग येऊन जीवे ठार करण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच अक्षय भोईटे (Akshay Bhoite) यालाही मारहाण केली.

दुसरी फिर्याद समीर दिलीप रानवडे Sameer Dilip Ranwade (वय २९, रा. श्रीरंग अपार्टमेंट, नर्‍हे) यांनी दिली आहे.
फिर्यादी हे राहत असलेल्या बिल्डिंगच्या समोर त्यांची गाडी पार्क करीत होते.
त्यावेळी त्यांच्याच इमारतीत राहणारा शिवराज शिंदे व त्याचे इतर साथीदार तेथे आले.
पूर्वीच्या भांडणाचे कारणावरुन फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करुन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मन्या, संजय व निखील यांनी फिर्यादी यांना पकडून ठेवले व शिवराज शिंदे याने कोयत्याने डोक्यात वार करुन जबर जखमी केले.
पोलीस निरीक्षक वाघमारे (Police Inspector Waghmare) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Attack of a businessman by goons for not paying ransom Three arrested including two innkeepers in narhe incident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा