Pune Crime | गांजा ओढणार्‍या 3 अल्पवयीन मुलांचा एकमेकांवर चाकू हल्ला; पुण्यातील कोंढवे -धावडे येथील घटना

पुणे : Pune Crime | ते तिघेही मित्र, तिघांनाही गांजा ओढण्याचे व्यसन लागलेले. अशात गांजा ओढत असताना डोक्यात नशा चढली आणि त्यांनी काहीही कारण नसताना एकमेकांवर चाकूने वार केले़ त्यात तिघेही जखमी झाले आहेत.

ही घटना कोंढवे -धावडे येथील जन्नीआई मंदिरामागील मोकळ्या जागेत १८ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा (Pune Crime) वाजता घडला. हे तिघेही १५ व १६ वर्षांची मुले आहेत.

उत्तमनगरमध्ये (Uttam Nagar) हे तिघे जण राहतात. त्यांच्या एका मित्रासह हे चौघे जण कोंढवे धावडे येथील मोकळ्या मैदानात रात्री साडेअकरा वाजता गांजा ओढत बसले होते. त्यावेळी काही कारण नसताना त्यांच्यात अचानक भांडणे सुरु झाली. १५ व १६ वर्षाच्या दोघा मुलांनी त्यांच्या दुसर्‍या मित्रावर चाकूने उजव्या गालावर व डोक्याच्या मागील  बाजूला वार करुन जखमी केले. त्यानंतर जखमी झालेल्याने त्याच्यावर वार करणार्‍या दोघांच्या बरगडीवर व कमरेवर वार करुन जखमी केले. तिघेही जखमी झाले असून उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) परस्पर विरोधी तक्रारी दाखल करुन घेतल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokde) अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Ramdas Kadam | ‘वैभव खेडेकरांच्या आरोपांना भीक घालत नाही, ते मनसेचे की राष्ट्रवादीचे?’ असा खेडच्या जनतेला प्रश्न – रामदास कदम

Bal Bothe : रेखा जरे खून प्रकरणातील आरोपी बाळ बोठे आणखी ‘गोत्यात’; जाणून घ्या प्रकरण

Live In Relationship |’लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये खर्च दोघांनी करावा किंवा कुणी एकाने, हा गुन्हा नाही – हायकोर्ट

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | attack of minor boys uttam nagar police case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update