×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | लग्नानंतरही प्रेमसंबंध? टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

Pune Crime | लग्नानंतरही प्रेमसंबंध? टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लग्न झाल्यानंतरही नात्यातील मुलीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) असल्याच्या संशयावरून तीन जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी (Seriously Injured) झाला आहे. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात (Wadgaon Nimbalkar Police Station) वैभव दिपक खरात (Vaibhav Deepak Kharat), हर्षद थोरात (Harshad Thorat) व सनी खुडे Sunny Khude (रा. तळवणीनगर, मुरुम, ता. बारामती-Baramati) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत युवराज नारायण सोनवणे (Yuvraj Narayan Sonawane) यांनी वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी (दि.24) रात्री सव्वा बाराच्या सुमारास सोमेश्वर कारखाना (Someshwar Factory) ते मुरूम रस्त्यावरील (Murum Road) विकासनगर येथे घडली आहे. या घटनेत आदित्य युवराज सोनवणे Aditya Yuvraj Sonawane (वय-22) हा गंभीर जखमी झाला आहे.(Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आदित्य याचे एका मुलीसोबत मागील तीन वर्षापासून प्रेमसंबंध आहेत. याच कारणावरुन फिर्यादी यांचा मुलगा आदित्य आणि आरोपी यांच्यात यापूर्वीही वाद (dispute) झाले आहेत. मात्र आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याने त्यांनी आपसात चर्चा करुन हा वाद मिटवला होता. दरम्यान, फिर्यादी यांचा मुलगा आदित्य याचे लग्न झाले.

 

मात्र, लग्नानंतर देखील आदित्य आणि ती मुलगी फोनवर संपर्कात असल्याचा संशय आरोपींना होता.
याच कारणावरुन रविवारी रात्री आदित्य याला दुचाकीवरुन गाठले.
आदित्यला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर कोयत्याने डोक्यात,
हातावर, चेहऱ्यावर आणि पोटावर सपासप वार केले.
यामध्ये आदित्य गंभीर जखमी झाला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे (API Somnath Lande) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | attack on a youth on suspicion of having a love affair after marriage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News