Pune Crime | वाईन शॉपच्या मालकावर हल्ला ! डोक्यात फोडली दारूची बाटली; 4 जणांवर FIR

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  वाईन शॉपमध्ये (wine shop) खरेदीसाठी आलेल्या चौघांना रांगेत येण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दुकानातील मॅनेजरला दमदाटी (Pune Crime) करत असताना वाईन शॉपचे मालक मध्यस्थी करण्यासाठी गेले असताना त्यांच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) घडली असून या घटनेत वाईन शॉप मालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींनी मारहाण (Pune Crime) करुन गल्ल्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास पिंपरी येथील रिगल वाईन शॉप (Regal Wine Shop) येथे घडला.

वाईन शॉपचे मालक कीर्ती लक्ष्मण राजपूत Kirti Laxman Rajput (वय-28 रा. सद्गगुरु बिल्डिंग, पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी 25 ते 30 वयोगटातील चार जणांवर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ती राजपूत यांचे अशोक टॉकिज (Ashok Talkies) जवळ रिगल वाईन शॉप नावाचे दुकान आहे.
मानसिंग हे दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. दसऱ्याच्या दिवशी रात्री 7.20 वाजता चारजण वाईन शॉपमध्ये आले होते.
त्यावेळी मॅनेजर मानसिंग यांनी चौघांना रांगेत येण्यास सांगितले. यावरुन चौघांनी त्यांच्यासोबत वाद घालून ओल्डमंक (Oldmank) आणि व्हिस्कीची मागणी केली.
आरोपींनी 700 रुपये बिलापैकी 500 रुपये रोख तर 300 रुपये फोन पे वरुन ट्रान्सफर केले. त्यांचे 700 रुपये बिल झाल्याने मॅनेजरने 100 रुपये परत दिले.
मात्र आरोपींनी व्हिस्कीचा फुल खंबा पाहिजे पैसे नको असे म्हणत त्यांच्यासोबत वाद घातला.

 

दरम्यान, त्यांचे बोलणे ऐकून फिर्यादी हे कॅश काउन्टरच्या बाहेर येऊन चौघांना समजावून सांगत होते.
त्यावेळी एकाने पिशवीत ठेवलेली दारुची बाटली त्यांच्या डोक्यात फोडली व तुटलेल्या भागाने फिर्यादी यांना मरण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी फिर्यादी यांनी उजवा हात समोर केल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
तसेच इतर आरोपींनी दुकानाच्या बाहेर लाईन लावण्यासाठी ठेवलेल्या लोखंडी पोलने त्यांना बेदम (Pune Crime) मारहाण केली.

आरोपींनी दुकानातील गल्ल्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला असता मॅनेजर मानसिंग आणि कामगार अर्जुन यांनी त्यांना दुकानाबाहेर काढून गेट बंद केले.
तर दुकानात असलेला फिर्यादी यांचा मित्र संजू याने बाहेर येऊन दुकानाला कुलुप लावले. यानंतर आरोपींनी लोखंडी पाईप आणि सिमेंटचे गट्टू दुकानावर मारले.
तसेच दुकानासमोर गोंधळ घालून कामगारांनी पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करुन दुचाकीवरुन पळून गेले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निखील डोळस (PSI Nikhil Dolas) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Attack on wine shop owner! A bottle of liquor smashed into his head; FIR on 4 persons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Money Laundering Case | ईडीच्या चौकशीला अनिल देशमुखांची गैरहजेरी, शोधासाठी तपास यंत्रणा झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’

Bitcoin ETF झाले लाँच, कशी आणि कुठे करू शकता गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानला न्यायालयाचा दणका, NDPS न्यायालकडून जामीन नाहीच