Pune Crime | ‘तू माझ्या मित्राचा मर्डर केला, तुझी विकेटच पाडतो’ म्हणत तरुणावर हल्ला; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ‘तू माझ्या मित्राचा मर्डर (Murder) केला, मी तुला जिवंत सोडणार नाही तुझी विकेटच पाडतो,’ असे म्हणत पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून पोलीस रेकॉर्डवरील (Pune Police) गुन्हेगाराला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार (Pune Crime) मंगळवारी (दि.6) रात्री साडेआठच्या सुमारास हडपसर येथील नवीन म्हाडा वसाहत (New Mhada Colony) येथे घडला.

कंठ्या (रा. गंगानगर, हडपसर), पिरम्या उर्फ पिटऱ्या (रा. रामटेकडी), पंक्या (रा. काळेपडळ), राहुल दोडे, मुस्तफा उर्फ खड्डा शेख (वय 20, रा. नवीन म्हाडा वसाहत, हडपसर) यांच्यावर आयपीसी 307, 506(2), 504, 427, 143, 144, 147, 148, 341, 352, आर्म अॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल केला असून, मुस्तफा उर्फ खड्डा शेख याला अटक केली आहे.
याबाबत शुभम शरद भंडारी (वय 26, रा. आय.टी.सी. कंपनी, रांजनगाव) याने
हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
फिर्यादी हे नवीन म्हाडा वसाहतीत राहणाऱ्या भावाकडे त्यांची पॅगो गाडी घेऊन आले होते. फिर्यादी तेथून परत जात
असताना आरोपींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. फिर्यादी यांनी गाडी वळवून भावाच्या घरी जात असताना जिन्यामध्ये आरोपी कंठ्या याने कोयत्याने पाठीवर
वार केला. मात्र, फिर्यादी यांनी वार चुकवून पहिल्या मजल्यावरील शाम लोखंडे यांच्या घरात आश्रय घेतला.

त्यावेळी आरोपींनी तू माझा मित्र बसवराज कांबळे याचा मर्डर केला आहे. मी तुला जिवंत सोडणार नाही.
तुझी विकेटच पाडतो असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच फिर्यादी यांच्या गाडीच्या काचा फोडून परिसरात
दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Attack on young man saying ‘You murdered my friend, I will knock down your wicket’; Incidents in Hadapsar area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

SC On Property Dispute | सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांना सल्ला; म्हातारपणाची काळजी घेतील, असे लिहून घ्या

Dharmendra | धर्मेंद्रनी सांगितला आयुष्यातील ‘तो’ किस्सा; ज्याची त्यांना आजही लाज वाटते