Pune Crime | खडकीत पूर्व वैमनस्यातून दोन गटात राडा; चाकूने परस्परावर वार, 11 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खडकी बाजार (Khadki Bazaar) येथे दोन गटात पूर्व वैमनस्यातून जोरदार धुमचक्री झाली असून त्यात कुऱ्हाड, चाकूने परस्परांवर वार करण्यात आले. या घटनेमध्ये सहा जण गंभीर जखमी (Injured) झाले असून खडकी पोलिसांनी (Khadki Police) ११ जणांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

 

याबाबत रब्बील शेख Rabbeel Sheikh (वय ३१, रा. खडकी बाजार) यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम बाळकृष्ण उमाळे Shubham Balkrishna Umale (वय २३), हितेश उर्फ सतीश चांदणे Hitesh alias Satish Chandane (वय २२), प्रज्योत ऊर्फ मोन्या बाळकृष्ण उमाळे Prajyot alias Monya Balkrishna Umale (वय २१, सर्व रा. राजीव गांधीनगर, खडकी), आकाश ऊर्फ आकु संजय वाघमारे Akash alias Aku Sanjay Waghmare (वय २२), सलमान नासिर शेख Salman Nasir Shaikh (वय २५), दीपक राजेंद्र डोके Deepak Rajendra Doke (वय २६, तिघे रा. महादेववाडी, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा मित्र शहबाज शेख (Shehbaz Sheikh) याच्यासह दुचाकीवरुन शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता शिवाजी पुतळ्यावरुन खडकीकडे जात होते. पूर्वीच्या भांडणातून आरोपींनी त्यांना थांबवून तुला जिवंत साेडणार नाही, तुला लय माज आलाय, तुला खल्लास करतो, असे म्हणून त्याच्याकडील चाकूने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादीने हात मध्ये घातल्याने तो वार हातावर बसला. तेव्हा किरण खुडे याच्याशी झटापट करुन त्याने चाकू काढून घेतला. या भांडणात फिर्यादी, त्यांचा मित्र शहबाज, सलीम शेख, अरविंद आडसुळे (Arvind Aadsule) असे चौघे जखमी झाले आहे.

याविरोधात शुभम उमाळे (वय २३, रा. खडकी बाजार) याने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी रब्बील रज्जाक शेख (वय ३१), शहबाज सलीम शेख (वय १८), रब्बीन रफिक शेख (वय २५),
प्रतिक सचिन सपकाळ (वय २४), मुस्तफा जहीर खान (वय २५, सर्व रा. खडकी) यांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

फिर्यादी हे खडकी बाजारमधील शिवाजी पुतळ्याजवळ आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते.
यावेळी किरण खुडे व दीपक डोके हे चाकू व पालघनने काही जणांना मारताना दिसत होते.
तेव्हा फिर्यादी व त्यांचे साथीदार मध्ये पडले असताना रब्बील शेख व इतरांनी लाकडी दांडके, कुऱ्हाड, कमरेचा पट्टा यांनी मारहाण केली.
परिसरात दहशत माजविली. या घटनेत फिर्यादी व त्यांचा मित्र किरण खुडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attacking each other with ax, knife in khadki, 11 people arrested in attempt to murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Deepak Kesarkar | शिंदे गटात सामील झालेल्या दीपक केसरकरांना लागली लॉटरी, मुंबईच्या पालकमंत्री पदाची मिळाली जबाबदारी

Raj Thackeray | मनसेचा मोठा गौप्यस्फोट ! राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना ‘दसरा मेळाव्यावरून दिला होता ‘हा’ सल्ला, मात्र…’

Nashik Crime | पतीचा निर्घुण खून करुन पत्नी गेली पळून; दुर्गंधी सुटल्याने झाला उलगडा