Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पूर्ववैमनस्यातून गुंडावर सराईत गुन्हेगारांनी (Pune Criminals) कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. ही घटना खडकीतील (Khadki) महादेववाडी येथील सर्वधर्म समभाव मित्र मंडळ ते आंबेडकर चौक (Ambedkar Chowk Khadki) दरम्यान गुरुवारी रात्री साडेदहा वाजता घडली. (Pune Crime)

याप्रकरणी खडकीतील एका १७ वर्षाच्या मुलाने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२८/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मलंग कुरेशी, अमित फिरोज खान (वय २०, रा. कुबा हाईटस, घोरपडी), अ‍ॅलेक्स, दास व त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. अमित खान याला अटक केली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. तसेच मंलग कुरेशी, अमित खान आणि अ‍ॅलेक्स हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. फिर्यादी आणि आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी हा त्याच्या मित्रासोबत सर्वधर्म समभाव मित्र मंडळाजवळ बोलत थांबला होता. यावेळी पूर्वीच्या भांडणाचे कारणावरुन आरोपी मोटारसायकलवरुन आले. त्यांनी हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या पायावर मारुन त्याला रस्त्यावर पाडले. मलंग कुरेश याने कोयत्याने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी याने हाताने तो अडविला असता फिर्यादीच्या हाताला जखम झाली. अमित खान याने कोयत्याने दंडावर वार (Attempt To Kill) करुन जखमी केले. फिर्यादी पळून जात असताना अ‍ॅलेक्स याने सिमेंटचा गठ्ठा उचलून फिर्यादीला फेकून मारला. इतरांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन कोयते हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक साळवी तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Attempt Kill Half Murder Pune Criminals Khadki Police Station Ambedkar Chowk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन