Pune Crime | ‘तु मला भाई म्हणत नाही’ तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून ब्लेडने वार, हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | ‘तु मला भाई म्हणत नाही, तुला मस्ती आली का’ असे म्हणत एका तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून ब्लेडने गळ्यावर सपासप वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime) मंगळवारी (दि.13) रात्री साडेसातच्या सुमारास हिंगणेमळा (Hinganemala) हडपसर येथे घडली. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

याबाबत सागर राजेंद्र गुप्ता (वय-26 रा. जुनी म्हाडा कॉलनी, हिंगणेमळा, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) बुधवारी (दि.14) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोन्या उर्फ विनोद बंडु कांबळे (वय-23 रा म्हाडा वसाहत, हडपसर) याच्यावर आयपीसी 307, 504, 506 आर्म अ‍ॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
मंगळवारी रात्री फिर्य़ादी हे लहु गर्जना ग्रुप चौकात मोबाईलवर बोलत उभे होते.
त्यावेळी आरोपी त्याचे मित्र अजय पाडुळे व अक्षय पाडुळे हे फिर्यादी जवळ आले.
कांबळे याने त्याच्याकडी कोयता काढून फिर्यादी यांच्या अंगावर धाऊन गेला. ‘तु मला भाई म्हणत नाही, तुला मस्ती आली आहे का’ असे म्हणत हातातील ब्लेडने फिर्य़ादी यांच्या गळ्यावर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. जखमी सागर गुप्ता याने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Murder In Hadapsar Area Of Hingnemala

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | ‘देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाही आलेली नाही, त्यामुळे सरकार आमच्या…’ – संजय राऊत

Satara Crime | साताऱ्यात पत्नीची पतीविरोधात पोलिसांत धाव; तो तिला विवस्त्र…

SBI Interest Rate | एसबीआयच्या व्याजदरात कमालीची वाढ

Horoscope 2023 | राशिफळ 2023 : ‘या’ 6 राशींचे 2023 मध्ये बदलणार भाग्य, नोकरीमध्ये होईल जबरदस्त फायदा