Pune Crime | ‘तुझ्यामुळे आमच्या बापाला खाली पहायला लागले’ ! भांडणे सोडविल्याच्या रागातून तिघांनी तरुणावर कोयत्याने केले वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भांडणे सोडविल्याने बापाला खाली पहायला लागले, या रागातून मुलांनी घरात शिरुन तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी गणेश भारतीनाथ सदभैय्या, नितेश सुनिल सदभैय्या आणि शुभम जयवंत बावरी (सर्व रा. कतारवाडी, येरवडा – Yerwada) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Attempt To Murder) दाखल केला आहे. याप्रकरणी विशाल बाबु सदभैय्या (वय ३५, रा. यशवंतनगर, कतारवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३२८/२२) दिली आहे. हा प्रकार सदभैय्या याच्या घरी शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खराडी (Kharadi) येथील एका कंपनीत सिनीअर एक्सीकेटीव्ह म्हणून नोकरी करत आहेत. त्यांच्या घराशेजारीच भावकीतील नितेश सदभैय्या, गणेश सदभैय्या राहतात. २० डिसेबर रोजी रात्री ९ वाजता ते कतारवाडी चौकात मित्राबरोबर गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्या भावकीतील गणेश सदभैय्या याचे वडिल भारतीनाथ सदभैय्या याचे महेंद्र बावरी याच्यासोबत पूर्वीच्या वादातून शाब्दीक वादावादी करु लागले. त्यावेळी फिर्यादी याने दोघांना समजावत त्यांच्यातील भांडण मिटवले. परंतु भारतीनाथ याला फिर्यादीने केलेली मध्यस्थी आवडली नाही. फिर्यादी हे २३ डिसेबरला दुपारी बारा वाजता जय महाराष्ट्र चौकात बोलत थांबले असताना गणेश तेथे आला व ‘‘तू परवा माझ्या वडिलांचे भांडण का सोडवले़ तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला होता़ थांब तुझा कायमचा बंदोबस्त करतो,’’ असे म्हणून तो तिथून निघून गेला. फिर्यादीही घरी आले.

दरवाजातून आत जात असताना गणेश, नितेश, शुभम बावरी धावत आले. त्यांच्याकडे लोखंडी रॉड कोयते होते. त्यांना पाहून फिर्यादी घरात गेले. परंतु गडबडीत दरवाजाची कडी लागली नाही. तेव्हा त्यांनी दरवाजावर लाथ मारुन फिर्यादी यांना बाहेर खेचले. ‘‘तुझ्यामुळे माझ्या बापाला परवा खाली मान घालावी लागली, आज आम्ही तुझा गेम करणारच,’’ असे गणेश याने म्हणत हातातील रॉडने फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली. नितेश याने लोखंडी पंच डोक्यात मारला. फिर्यादी हे जोर जोरात ‘‘वाचवा वाचवा ’’ असे ओरडू लागले. तेव्हा त्यांची आई बाहेर आली. ती व फिर्यादीची पत्नी सोडवायला आली असताना नितेश याने ‘‘ये म्हतारे तु जरमध्ये आलीस तर तुला पण खल्लास करीन’’ असे म्हणत आईच्या कानशीलात लावली. पत्नीलाही शुभम बावरी व गणेश याने हाताने मारहाण केली.

 

नितेश व शुभम यांनी कोयता हवेत फिरवत ‘‘जर याला सोडवायला कुणीमध्ये आला तर याद राखा़ आम्ही इथले भाई आहोत,
जर कुणी मध्ये आला तर खल्लास करुन टाकीन, आमच कुणी काही वाकड करु शकत नाही, ’’असे म्हणाले.
तेव्हा शेजारी राहणार्‍यांनी घाबरुन दारे खिडक्या बंद केल्या. तेव्हा फिर्यादी यांचा भाऊ सोमनाथ
रामनाथ व राहुल बावरी हे धावत असल्याचे पाहून तिघेही ‘‘आज आमच्या तावडीतून वाचलास,
पण उद्या कोण वाचवेल, आम्ही उद्या तुला ठार करु’’ असे म्हणून तेथून निघून गेले.
पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गेंड तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Murder Vishrantwadi Police Station Yerwada Kharadi News

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | बिल्डर सूरज परमारच्या डायरीत कुणाचं नाव? संजय राऊतांची SIT चौकशीची मागणी

Ashish Shelar | संजय राऊतांनी रावणरक्षा वाचण्यापेक्षा रामरक्षा वाचावी – आशिष शेलार

MNS | जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खोटे शिक्के तयार केले आणि बानवट सही केली; मनसेच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा