Pune Crime | जमीन बळकाविण्यासाठी जीवे मारण्याचा प्रयत्न ! माजी नगरसेवक विष्णु हरिहर यांच्यासह चौघांविरूध्द गुन्हा दाखल, स्वारगेट पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | येवलेवाडी (Yewalewadi) येथील जमिनीचा आपल्याबरोबरच व्यवहार करावा (Land Grabbing Case In Pune), यासाठी धमकावून गुंडांमार्फत (Pune Criminals) जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या (Attempt To Kill) प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक (Former BJP Corporator) विष्णु हरिहर (Vishnu Appa Harihar) यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

विष्णु अप्पा हरिहर, राहुल दत्ताराम खुडे Rahul Dattaram Khude (वय ३८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), प्रेम शाम क्षीरसागर Prem Shyam kshirsagar (वय १८, रा. पर्वती दर्शन) व त्याचे इतर साथीदारांवर गुन्हा दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) राहुल खुडे व प्रेम क्षीरसागर या रेकॉर्डवरील (Criminals On Pune Police Record) गुंडांना अटक केली आहे.

 

याबाबत सादीक सलीम खोजा (वय ३९, रा. बोट क्लब रोड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ११५/२२) दिली आहे. ही घटना सॅलिसबरी पार्कमधील (Salisbury Park Pune) गोल्डन बेकरीसमोर २७ मे रोजी रात्री साडेनऊ व ६ जून रोजी दुपारी चार वाजता घडली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे (Real Estate Business). त्यांची वडिलोपार्जित जमीन कोंढवा (Kondhwa) येवलेवाडी येथे आहे. तेथे त्यांना काही तरी व्यावसायिक प्रकल्प सुरु करायचा होता. पण, लॉकडाऊनमुळे (Coronavirus Lockdown) ते व्यवसाय सुरु करु शकले नाही. २०२१ मध्ये विष्णू हरिहर व राहुल खुडे यांच्याकडे आले व ती जमीन त्यांना पाहिजे असल्याचे सांगितले. योग्य भाव दिल्यास व्यवहार करु असे बोलणे झाले. त्यानंतर ती जागा हरिहर यांनाच विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू लागले. २७ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी यांचे मित्र नसीर अन्सारी यांच्या सॅलिसबरी पार्क येथील गोल्डन बेकरीजवळ विष्णु हरिहर व इतर लाठ्या, काठ्या, कोयते घेऊन आले. नसीर अन्सारी यांना दमदाटी करुन त्यांच्या कारची तोडफोड केली. स्थानिक राजकीय व्यक्ती एकनाथ ढोले यांनी मध्यस्थी केल्याने नसीर अन्सारी यांनी तक्रार केली नव्हती.

या घटनेनंतर १ जून रोजी फिर्यादी यांना राहुल खुडे यांचा फोन आला. त्यात खुडे याने फिर्यादींना धमकाविले.
येवलेवाडी येथील जमिनीचा व्यवहार विष्णु हरिहर बरोबर कर. नाही तर गोळ्या घालून मारेल, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांनी त्याला महत्व दिले नाही.

 

फिर्यादी हे ६ जून रोजी दुपारी नसीर अन्सारी यांना भेटण्यासाठी गोल्डन बेकरी (Golden Bakery Pune) येथे आले होते.
त्यांच्याशी व्यवहारासंबंधी मिटींग करुन ते बेकरीबाहेर लावलेल्या कारकडे आले असताना त्यांना काही अंतरावर राहुल खुडे हा मोटारसायकलवर आलेला दिसला.
त्यांना पाहून तो मोटारसायकलवरुन उतरुन त्यांच्या दिशेने रिव्हाल्व्हरसारखे काही तरी काढून त्यांच्या दिशेने रोखून धरत होता.
फिर्यादी हे घाबरून तातडीने कारमध्ये बसून जीवाच्या भितीने वेगात कार चालवत घरी आले.
धाडस करुन ते महर्षीनगर पोलीस चौकी (Maharshi Nagar Police Chowki) येथे तक्रार देण्यासाठी गेले.
परंतु जीवाच्या भितीने राहुल खुडे व विष्णु हरिहर काही तरी अपाय करेल, या भितीने त्यांनी सविस्तर तक्रार दिली नाही.
पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Attempt to kill to grab land A land grabbing case has been registered against four persons including former bjp corporator Vishnu Harihar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा