Pune Crime | मित्राची गर्लफ्रेंड पटवल्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार, गोळीबार मैदान ते लुल्लानगर चौकादरम्यानची घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मित्राने एकाची गर्लफ्रेंड (Girlfriend) पटवल्याने त्याचा राग मनात धरुन तरुणावर तिघांनी कोयता व चाकूने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. (Pune Crime)

 

याप्रकरणी नदीम अहमद सय्यद Nadeem Ahmed Syed (वय २७, रा. चुडामण तालीम, भवानी पेठ) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१०/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी इरफान इम्तीयाज खान Irrfan Imtiaz Khan (वय २५), मोसीम सलीम शेख Mosim Salim Shaikh (वय २४, रा. मनीष पार्क, कौसरबाग, कोंढवा -Kondhwa) व आणखी एकावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार गोळीबार मैदान चौक ते लुल्लानगर चौक (Golibar Maidan Chowk to Lullanagar Chowk) दरम्यान शनिवारी पहाटे साडेतीन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र साहील गुलाम शेख (Sahil Ghulam Sheikh) हे मोटारसायकलवरुन पहाटे चहा पिण्यास जात होते. त्यावेळी आरोपी यांचा पाठलाग करत आले. त्यांनी लुल्लानगर चौकात त्यांना गाठले. साहील शेख याने इरफान खानची गर्लफ्रेंडला पटविले होते. त्याचा राग त्यांच्या मनात होता. या कारणावरुन त्यांनी साहील याच्यावर कोयता व चाकूने खांद्यावर, बरगडीवर व डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. साहील याच्यावर उपचार करण्यात येत आहे. पोलिसांनी (Pune Police) मोसीम शेख याला अटक (Arrest) केली असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड (Sub-Inspector of Police Gaikwad) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to kill wanwadi police station news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा