×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | हॉटेलचे भाडे मागितल्यावरून टोळक्याकडून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; धनकवडीमधील...

Pune Crime | हॉटेलचे भाडे मागितल्यावरून टोळक्याकडून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; धनकवडीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भाड्याने चालवण्यास दिलेल्या चायनीज हॉटेलचे भाडे मागितल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत तरुण आणि त्याचा मित्र जखमी झाले आहेत. हा प्रकार (Pune Crime) गुरुवारी (दि.1) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील सार्वजनिक रोडवर घडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली.

 

याबाबत विनोद नेमीनाथ जंगम (वय 24, रा. तळजाई पठार, पुणे) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुकेश शिवाजी इंगळे (वय 45), निकिता मुकेश इंगळे (वय 35, रा. संतोषनगर, कात्रज), ऋषिकेश बर्डे (वय 22, रा. कात्रज), तन्मय उर्फ बिट्टू मुकेश इंगळे (वय 17, रा. कात्रज) यांच्यावर आयपीसी 307, 324, 323, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुकेश इंगळे याला अटक केली. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी त्यांचे आर्या चायनीज हॉटेल आरोपी मुकेश इंगळे याला भाड्याने चालवण्यास दिले आहे. फिर्यादी हे वारंवार हॉटेलचे भाडे मागत होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री फिर्यादी हे हत्ती चौकातील उषा पॅलेससमोरील सार्वजनिक रोडवर थांबले होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. आमच्याकडे पैसे मागतो का? आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणत ऋषिकेश बर्डे याने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. मात्र, फिर्यादी यांनी हा वार चुकवल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

तर मुकेश इंगळे याने फिर्यादी यांच्या पाठीवर चाकूने वार केला. परंतु, वार चुकवल्याने त्याचा शर्ट फाटला.
तसेच निकिता इंगळे हिने फिर्यादी यांचा गळा दाबला तर तन्मय याने पट्ट्याने बेदम मारहाण केली.
हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मित्र शुभम दाते हा आला असता आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण केली.
तसेच बर्डे याने फरशीचा तुकडा फेकून मारल्याने शुभम दाते हा जखमी झाला.
पोलिसांनी आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून मुकेश इंगळे याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to kill young man by mob for demanding hotel rent; Incidents in Dhankawadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Power Supply Off | शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरात उद्या (रविवार) सकाळी ‘या’ वेळेत होणार बत्ती गूल

Raj Thackeray | ‘राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू; पण माझा महाराष्ट्र सैनिक…’ – राज ठाकरे

Bharosa Cell Pune | पती-पत्नीमध्ये दुरावा वाढतोय; दर अडीच तासाला भरोसा सेलमध्ये एक तक्रार दाखल

Railway IRME Exam-UPSC | केंद्रीय लोकसेवा आयोगावर मोठी जबाबदारी; आयोजित करणार रेल्वे भरतीच्या ‘या’ परीक्षा

Must Read
Related News