Pune Crime | मुंढव्यात तरूणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, सहा ते आठजणांविरूद्ध गुन्हा

पुणे – Pune Crime | तरूणाला पकडून त्याच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करीत सहा ते आठ जणांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केल्याची घटना १५ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगरमध्ये घडली. (Pune Crime)

याप्रकरणी वैभव थोरात Vaibhav Thorat (वय १९ रा. केशवनगर, मुंढवा) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) तक्रार दिली आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव १५ ऑक्टोबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास मुंढव्यातील रेणूका माता मंदीर परिसरात थांबला होता. त्यावेळी आलेल्या सहा ते आठजणांनी वैभवला पकडून भाजी मंडईजवळ नेले. तुला आज खल्लास करतो असे धमकावून एकाने वैभवच्या डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, वैभवने कोयत्याचा वार चुकविला. त्यानंतर टोळक्याने वैभवचे डोके मोटारीच्या बोनटवर आपटून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक साहेबा पोटे (Assistant Police Inspector Saheba Pote) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Attempt to kill youth in Mundhwa, crime against six to eight people

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा