Pune Crime | भांडणात मध्यस्थी केल्याने सराईत गुन्हेगारासह चौघांकडून तरुणावर कोयत्याने वार

पुणे : Pune Crime | भांडणे मिटविण्यासाठी मध्यस्थी केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारासह चौघांनी तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) तिघांना अटक केली आहे. अविनाश ऊर्फ पप्पु चंद्रकांत चौधरी (वय ३६), विशाल ऊर्फ पिंटु चौधरी (वय ३८), आकाश यादव (वय २५, तिघेही रा. गुरुवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेखर चिकने (रा. गाडीखाना, शुक्रवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अविनाश चौधरी हा पोलिसांच्या (Pune Crime) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

याप्रकरणी गौरव रोहिदास काची (वय ३७, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. काची आणि आरोपी हे मित्र असून एकाच ठिकाणी राहतात. फिर्यादी यांचा मित्र दुर्गेश व आरोपी यांच्यामध्ये भांडणे झाली होती. ही भांडणे मिटविण्यासाठी फिर्यादी हे गेले होते. त्याच्या रागातून अविनाश चौधरी याने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार करुन गंभीर जखमी केले. विशाल चौधरी याने लाकडी बांबुने पाठीत मारले. आकाश यादव याने लाकडी स्टंपने पायावर मारले. अविनाश चौधरी याने कोयता हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. खडक पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघा जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

Home loan संबंधीत 11 गोष्टी ज्या जाणून घेणे आवश्यक, अन्यथा कॅन्सल होऊ शकते लोन अ‍ॅप्लिकेशन;

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ED ची लुक आऊट नोटीस; ED ला वाटते देशमुख जातील परदेशात ‘पळून’

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | attempt to murder case, khadak police arrest three

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update