Pune Crime | उसने पैसे न दिल्याने कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न; पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौकातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उसने पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने कोयत्याने डोक्यात वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केला. यावेळी तेथे असलेल्या लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण केली. याप्रकरणी जमीर हुसेन शेख (वय 33, रा. पत्राची चाळ, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (samarth police station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

त्यावरुन समर्थ पोलिसांनी (गु. र. क्र. 170/21) नाजीम नजीर शेख (वय 30, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध 307, 504, 56 सह मपोका 37/1 सह 135 आर्म अ‍ॅक्ट 4/25 आणि क्रि. अ‍ॅमे. अ‍ॅक्ट 7 खाली खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ए डी कॅम्प चौकातील (ad camp chowk) महाराष्ट्र पान शॉपसमोर 30 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीर शेख हे महाराष्ट्र पान शॉप येथे पाणी पिण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा तोंड ओळखीचा नाजीम शेख तेथे आला. त्याने फिर्यादी यांना उसने 10 हजार रुपये मागितले. फिर्यादी यांनी ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने रागाने फिर्यादीला ‘‘तूने क्या नाटक लगाया है’’ असे बोलून शिवीगाळ केली. आपल्याजवळील लोखंडी कोयता काढून हवेत फिरवून बघत असलेल्या लोकांकडे रोखून ‘‘काई बीचमे आया तो मार डालुंगा’’ असे बोलत दहशत निर्माण केली. फिर्यादीस जीवे ठार मारण्याच्या (Attempt to Murder) उद्देशाने कोयता डोक्यात मारुन गंभीर (Pune Crime) जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | attempt to murder case register in samarth police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी झाली वाढ; जाणून घ्या पुणे शहरातील इंधनाचे दर

Pune News | ‘२० मार्च व्हेंचर्स’ या संस्थेला आर्थिक सहाय्य मिळावे ! खा. गिरीश बापट यांचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना निवेदन

Traffic New Rules | ‘रॅश ड्रायव्हिंग’ अन् भरधाव वाहने चालविणार्‍यांनी व्हावं सावध ! ‘या’ नवीन सिस्टमध्ये ‘तात्काळ’ कापले जाईल ‘चलान’ आणि रद्द होईल ‘DL’