Pune Crime | शिवीगाळ का करतो, असे विचारल्याने तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | रिक्षात बसलेल्या तरुणाला खाली उतरायला लावून त्याला दोघे जण शिवीगाळ करु लागले. त्याने शिवीगाळ का करता, असे विचारल्यावर त्यांनी कोयत्याने (Pune Crime) सपासप वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. हा प्रकार दांडेकर पुलावरील माऊली मेडिकलसमोर बुधवारी रात्री अकरा वाजता घडला.

 

याप्रकरणी आकाश संतोष देवरुखे Akash Santosh Devrukhe (वय 22, रा. दांडेकर पुल) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मनोज ऊर्फ मन्या दिनेश मेरवाडे (Manoj alias Manya Dinesh Merwade) आणि ऋतिक शरद सोनवणे Hrithik Sharad Sonawane (वय 19, दोघे रा. दत्तवाडी) यांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र अनिल शिंदे (रा. कोथरुड) हे रिक्षात बसून बोलत होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा मन्या व ऋतिक तेथे आले. त्यांनी फिर्यादी याला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितले. दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मनोज मेरवडे हा आकाश याला म्हणाले, तू लय येडे चाळे करुन नको, नीट रहा त्यावर आकाश याने मी काय केले आहे. मला शिवीगाळ करु नका, असे बोलला. तेव्हा ऋतिक याने मनोज यास खल्लास करुन टाक असे सांगितले.

मनोज याने कमरेला लावलेला कोयता काढला व आकाश याच्या डोक्यात वार केला. मनोज याने आणखी दोन वार डोक्यात केले. मनोज याचा साथीदार ऋतिक याने लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर आकाश जीव वाचविण्यासाठी पळून जाऊ लागला. तेव्हा ते दोघेही थांब तुझा मुडदा पाडतो, असे बोलून त्याच्या पाठीमागे पळत येऊन लागले. मनोज याने त्याच्याकडील कोयत्याने आणखी एक वार केला. तो आकाश याच्या पाठीवर बसला. त्यामुळे पळता पळता आकाश पाय घसरुन पडला. यावेळी मनोज व ऋतिक याने लोखंडी रॉडने मारहाण केली.

 

मनोज याने कोयत्याने आणखी एक वार केला. तो वार आकाश याच्या मांडीवर बसला.
जीवाच्या आकांताने आकाश उठून पुन्हा पळू लागला. जीव वाचविण्यासाठी तो सहारा हॉस्पिटलमध्ये शिरला.
तेव्हा ते दोघे पळून गेले. आकाश याच्या डोक्यातून, पाठीतून व उजव्या पायाच्या मांडीतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता.
डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर आकाश याला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) दाखल करण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Murder Dattawadi Police Station Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

 

Nanded to Pune Railway | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! नांदेड-हडपसर रेल्वे आता दररोज नांदेड ते पुण्यापर्यंत धावणार

 

Manipur Landslide | मणिपूरमध्ये दरड कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू; लष्करी जवानांचा समावेश, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले