Pune Crime | माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | माचिस नाही असे सांगितल्याने दोघांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा (Attempt To Murder) प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्पमध्ये घडला (Pune Crime) आहे.

 

याप्रकरणी आशिष महेंद्र शर्मा (वय ३२, रा. सुरक्षानगर, वैदुवाडी, हडपसर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार कॅम्पमधील (Pune Camp News) कुरेशी मस्जिदजवळ सोमवारी रात्री घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष शर्मा व त्यांचा मित्र हे सिगारेट पिण्यासाठी कोच लेनमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे उभ्या असलेल्या एका मुलाने फिर्यादीकडे माचिस मागितली. तेव्हा फिर्यादी याने त्यांना आमच्याकडे माचिस नाही, असे सांगितले.

 

त्यावर लाल टी शर्ट घातलेल्या मुलाने “हमे माचिस नही देता क्या” असे बोलून टपरीवर असलेला लोखंडी रॉड काढून
“अब तेरा मर्डर कर डालता” असे बोलून फिर्यादी यांच्या डोक्यावर मारला.
त्यांना खाली पाडून दुसर्‍या आरोपीने बांबुने फिर्यादीच्या पाठीवर मारुन त्यांना गंभीर जखमी केले.
लष्कर पोलिसांनी (Camp News) खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक शिळीमकर तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt to murder of a young man by not giving him a match; Incidents in the camp area of ​​Pune lashkar police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा