Pune Crime | पैशाच्या वादातून 5 जणांच्या टोळक्याकडून तरूणावर खुनी हल्ला, हडपसरमधील ससाणे नगरमधील घटना

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Pune Crime | हात उसने दिलेल्या पैशावरून वाद झाल्यानंतर पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर हल्ला करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर येथील ससाणेनगर (Sasane Nagar, Hadapsar) भागात ही घटना (Pune Crime) घडली आहे.

याप्रकरणी प्रथमेश आडाळे (वय 21, चिंतामणी नगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) तक्रार दिली आहे.
त्यानुसार मोहन यादव, रोहित उर्फ बिडी, दादा मगर व इतर दोघावंर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण नोकरी करतो. दरम्यान फिर्यादी व त्याचा मित्र गौरव यांची रोहीत उर्फ बीडी याच्यासोसबत हात उसने पैसे न दिल्यावरून वाद झाले होते.
त्याचा राग आरोपींच्या मनात होता. तर दोन दिवसांपूर्वी मोहन याने फोनकरून
फिर्यादी तरुणाला पुरोहित चौकात बोलावले.
फिर्यादी तेथे गेल्यानंतर रोहित याने त्यांना गाडीवर बसून चल असे सांगितले.
मात्र त्यांनी येण्यास नकार दिला. त्यावेळी या आरोपींनी संगनमत करत त्याला लाकडी
दांडक्याने बेदम मारहन करत त्याचे खुनाचा प्रयत्न केला आहे.
अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे करत आहेत.

Web Title : Pune Crime | attempt to murder of youth by gang of 5 over money dispute, incident in Sasane Nagar, Hadapsar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Wakad Police | सराईत 3 वाहन चोरटे गजाआड, 2.5 लाखांच्या 7 दुचाकी जप्त 

Vishwajeet Kadam | कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी

Corona Cases in Pune | दिलासादायक ! पुण्यात उपचाराधीन रुग्णसंख्येत प्रचंड घट; शहरात 916 जणांवर विविध रुग्णालयात उपचार