×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | बढाई समाज ट्रस्टच्या अध्यक्षाच्या खूनाचा प्रयत्न; रविवार पेठेतील घटना

Pune Crime | बढाई समाज ट्रस्टच्या अध्यक्षाच्या खूनाचा प्रयत्न; रविवार पेठेतील घटना

पुणे : Pune Crime | समाजाच्या ट्रस्टच्या कार्यक्रमाच्या खर्चाचा हिशोब समाजाच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकल्यावरुन दोघांनी बढाई समाज ट्रस्टचे (Badhai Samaj Trust) अध्यक्षांना मारहाण (Beating) करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime)

याप्रकरणी शैलेश नारायण बढाई Shailesh Narayan Badhai (वय ३८, रा. रविवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कमलेश बालाजी बढाई Kamlesh Balaji Badhai (वय ३५, रा. धायरी) आणि दिनेश बालाजी बढाई Dinesh Balaji Badhai (वय ३८, रा. वडगाव पठार) यांना अटक केली आहे. ही घटना रविवार पेठेतील बढाई गल्लीत सोमवारी रात्री नऊ वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश बढाई हे बढाई समाज ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.
समाजाचे ट्रस्टचे सर्व आर्थिक व्यवहार ते पहातात.
विविध कार्यक्रमात झालेल्या खर्चाचा हिशोब ते त्यांचे समाजाचे व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकत असतात.
रविवारी रात्री ते घराजवळ असताना कमलेश व दिनेश आले.
कमलेश याने तु माझा भाऊ दिनेश याचा मित्र ऋषी परब याला व्हॉटसअ‍ॅपवर मॅसेज का पाठवला.
असे म्हणून त्यांनी शिवीगाळ करुन फिर्यादी यांना मारहाण केली.
कमलेश याने गळा हाताने जोरात दाबून त्यांचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी यांच्या पोटावर, छातीवर, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दिनेश याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक काळे (Police Sub-Inspector Kale) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Attempted assassination of chairman of Badhai Samaj Trust; Incidents in Raviwar peth

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | 50 खोके घेतल्याचा आरोप करणं अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना महागात पडणार?, शिंदे गटाने घेतला मोठा निर्णय

Maharashtra DCP / Addl SP / SP Transfers | बदली करण्यात आलेल्या 6 पोलीस अधिकाऱ्यांची नव्याने पदस्थापना; DCP नम्रता पाटील, श्वेता खेडकर, तिरुपती काकडे यांचा समावेश

Pune Crime | येरवडा कारागृहांमध्ये कैद्यांमध्ये हाणामारी; हवालदारास मारहाण

Must Read
Related News