×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | गालावर सिगारेटचे चटके देऊन पत्नीचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न;...

Pune Crime | गालावर सिगारेटचे चटके देऊन पत्नीचा गळा दाबून खूनाचा प्रयत्न; पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल

पुणे : Pune Crime | आई वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन येण्यासाठी महिलेच्या गालावर त्याने सिगारेटचे (Cigarettes) चटके दिले. गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) करुन तीन वेळा तलाक असे बोलून महिलेला घरात कोडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) खूनाचा प्रयत्न, कौटुंबिक हिंसाचारासह मुस्लिम वूमन अ‍ॅक्टखाली पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

फारुख शेख Farooq Shaikh (वय ३१), शकशावली शेख (Shakshavali Sheikh), नुरजहा शेख (Nurjaha Shaikh), शब्बीर शेख (Shabbir Shaikh), आयेशा शेख (Ayesha Shaikh) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका २२ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११०५/२२) दिली आहे. हा प्रकार लोहगाव येथील वडगाव शिंदे येथे व दिघी येथील चौधरी पार्कमध्ये २१ नोव्हेबर २०२१ ते २१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून त्यांचे
मनासारखे वागले नाही. त्यांचा पती फारुख याचे दुसरे लग्न लावून देऊ, अशी भिती घालून फिर्यादीने त्यांच्या
आई वडिलांकडून ५ लाख रुपये आणावेत, यासाठी त्यांचा छळ केला. १० ऑक्टोबर रोजी फिर्यादीचा गळा दाबून
जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीने २१ ऑक्टोबर रोजी फिर्यादीशी विनाकारण भांडण काढून बेदम मारहाण (Beating) केली. टणक वस्तूने त्यांच्या उजव्या गालावर मारहाण केली. गालावर सिगारेटचे चटके दिले. गळ्याला चावून तक्याने फिर्यादीचे तोंड दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तीन वेळा तलाक तलाक असे बोलून फिर्यादी यांना घरात कोंडले. घराला कुलूप लावून निघून गेला. तसेच फिर्यादीच्या स्त्री धनाचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर (Assistant Police Inspector Shilamkar) तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Attempted murder by strangling his wife with a cigarette on her cheek; A case has been filed against 5 persons including the husband

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

T20 World Cup 2022 | दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! भारताची सेमीफायनलमध्ये धडक

Ind vs Zim | मेलबर्नमधील सामन्यात रोहित शर्मा करणार टीममध्ये बदल? ‘या’ खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

Must Read
Related News