Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

पुणे : Pune Crime | युवकाला अडवून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. त्याचा जाब विचारल्याने गुंडाने त्याला व मदतीला आलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. (Pune Crime)

भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) खाश्या ऊर्फ कासीम बाबुलाल शेख Khashya alias Qasim Babulal Shaikh (रा. गुजरवाडी फाटा, जाधवनगर) या गुंडाविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Half Murder Case)

याबाबत आकाश उमेश काळे Akash Umesh Kale (वय १९, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज – Mangdewadi Katraj) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४२/२२) दिली आहे. ही घटना कात्रज (Katraj, Pune) येथील भारतनगर गणपती मंदिराजवळ २८ सप्टेबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश काळे हा दुचाकीवरुन घरी जात असताना कासीम हा त्याच्या गाडीसमोर आला. त्याला शिवीगाळ करुन माझ्या अंगावर गाडी घालतो का असे म्हणून त्याच्याशी झटापट करुन खिशातील अडीचशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तेव्हा आकाश याने त्यास माझे पैसे का घेतले, तुझा काय संबंध आहे, असे विचारले. कासीम याने त्याच्या कानाखाली मारली. त्यामुळे तो तोल जाऊन गाडीसह खाली पडला. त्याने उठून मला का मारले अशी विचारणा केली. तेव्हा त्याने पुन्हा हाताने मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. “तू कुठला आहे. मला हात लावतोस आता तुला मी मारुनच टाकतो,” असे म्हणून त्याने कमरेला लावलेला कोयता काढून आकाश याच्या डोक्यात मारला. त्यामुळे तो आरडा ओरडा करु लागला.

तेथे नागरिकांची गर्दी जमा झाली.
त्या दरम्यान त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा त्याच्या मदतीला आल्याचे पाहून त्याने भावाला
“थांब आता तुझा पण मर्डर करतो,” असे म्हणून त्याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण केली.
त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन तो खाली पडला. हा प्रकार पाहून तेथे नागरिक जमा होऊ लागले.
तेव्हा त्याने हवेत कोयता फिरवून “मी इथला भाई आहे. माझ्या नादाला कोणी लागले तर त्याला तोडून टाकणार”
असे म्हणून दहशत पसरविली. त्यामुळे त्यांच्या मदतीला कोणी आले नाही.
दुकानदारांनी दुकाने बंद केली. त्यानंतर तो तेथून पळून गेला.
तेथील नागरिकांनी आकाशच्या भावाला उचलून उपचार करता पाटील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.
दोघांच्या डोक्यात गंभीर जखम झाली असून त्यावर डॉक्टरांनी टाके टाकले आहेत.
ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आकाश काळे याने फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता (Sub-Inspector of Police Dheeraj Gupta) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Attempted murder of a youth by a goon in Katraj area, stabbed with a coyote

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही”, PAK च्या माजी कर्णधाराने बुमराहवर टीका करणाऱ्यांना सुनावले

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Traffic Jam In Pune Due To Heavy Rain | शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरभर वाहतुकीचा खेळ खंडोबा; 60 ठिकाणी झाडपडी